राजे ट्रेकर्स व मराठा सिंडिकेट महाराष्ट्र राज्य संस्थे- तर्फे गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप

प्रतिनिधी-(कल्पेश कोरडे -कोरडे-खोडाळा)



 ".....प्रवास सह्याद्रीचा वारसा इतिहासाचा" या उक्तिला साध्य होईल असं अभुत पूर्व कार्य "राजे ट्रेकर्स व मराठा सिंडिकेट" या गडसंवर्धन कार्य करणाऱ्या संस्थांनी हाती घेतलं आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात गड-किल्ले संवर्धन कार्याला पूर्विपासूनच नव-तरुण तसेच सर्व वयाच्या मावळ्यांनी शीलेदारांनी आपल्या हृदयात पहील पसंती आणि मानाच स्थान दिलं आहे.

............ असाच एक उपक्रम काही तरुण मंडळींचा गृप राबवत आहे. गडसंवर्धन कार्यासोबतच "राजे ट्रेकर्स व मराठा सिंडिकेटच्या संयुक्त विद्यमानाने" या २०१८-१९ च्या शैक्षणिक वर्षात "महाराष्ट्राची सामाजिक व शैक्षणिक अस्मिता" जपत या संस्थेतील तरुण   वर्गाने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा गावालगतच्या अतिदुर्गम भागात मोडणाऱ्या  किनिस्ते नामक गावातील "जि.प.डिजीटल शाळा किनिस्ते" या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

      "राजे ट्रेकर्स व मराठा सिंडिकेटच्या शिलेदारांनी" एकत्र येवून  स्वपरीने स्वखर्चाने जि.प.डिजीटल शाळा किनिस्ते येथील २१९ गरिब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप करित सामाजिक बांधिलकी जपली.
          या शैक्षणिक उपक्रमा दरम्यान २१९ विद्यार्थ्याना स्कूल बँग्स , चपला , रेनकोट , एक्झाम पँड्स , कलर बॉक्स , विविध प्रकारचे खेळाचे साहीत्य , संगितवाद्य , काही थोर महान पुरुषांच्या पुस्तकांचे संच , व खाऊचे देखील वाट्प गरिब व गरजू विद्यार्थ्यांना केले.

Post a Comment

Previous Post Next Post