कामा संघटनेच्या प्रयत्नांना यश .....

एमआयडिसीतील पायाभूत सुविधांमुळे उत्पादकता व रोजगारात वाढ होणार.... 

डोंबिवली :- ( शंकर  जाधव) एमआयडीसी परिसरात सुमारे ३५० रासायनिक कारखाने आहेत. तर १५० कापड निर्मितीचे कारखाने आहेत. मात्र येथील पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने येथील व्यवसायांवर परिमाण होत असतो. यासाठी कामा संघटना गेली ७ ते ८ वर्ष एमआयडीसीकडे पाठपुरावा करत आहे.  अखेर संघटनेच्या प्रयत्नांना यश आले असून पायाभूत सुविधा तातडीने मार्गी लागणार असून दिड हजार कोटींपेक्षा जास्त निर्यात होऊन या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.


     महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण (एम आय डी सी )  चे मुख्याधिकारी संजय शेट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त वेलारासू व कामा ( कल्याण अंबरनाथ मँन्युफँक्चरींग असोशिएशन)  संघटनेचे अध्यक्ष मुरली अय्यर व सचिव देवेन सोनी यांनी गेल्या महिन्यात यासंदर्भात मुंबई येथे बैठक झाली होती. याबाबत सचिव देवेन सोनी यांनी अधिक माहिती दिली. या बैठकीत एमआयडीसीच्या वतीने ४० कोटींची निविदा काढण्याची मंजूरी देण्यात आली. यातील तरतूदीतून एमआयडीसीच्या परिसरातील गटार  व दिव्याबत्तींची सोय करण्यात येईल. ही सोय केल्यानंतर या परिसराचे हस्तांतर पालिकेकडे करण्यात येईल. पालिका येत्या वर्षात  रस्त्याचे काम मार्गी लावणार आहे.एमआय डीसी परिसरात सुमारे ३५० रासायनिक कारखाने आहेत. तर १५० कापड निर्मितीचे कारखाने आहेत. दहा हजारावर कामगार आहेत. गेली आठ दहा वर्षापासून येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे.रस्त्यावर दिव्यांची सोय नाही.त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतो.कंपन्यांच्या उत्पादनाची वाहतूक सुरक्षितरित्या करणे जिकरीचे होत आहे.रस्त्याच्या कडेला दिवाबत्तीची सोय नसल्याने कामगारांच्या पगार चोरांकडून लुटला जातो.दिवे नसल्याने सीसीटीवी कँमेरे लावता येत नाहीत. अशी अवस्था असल्याने त्याचा परिणाम थेट उत्पादन वाढीवर होत आहे. उत्पादन प्रक्रिया, उत्पादनाचा दर्जा,संशोधन विभाग, कुशल कामगार याचे निरिक्षण करण्यास इतर कंपन्यांचे अधिकार इथे येत नाहीत. वैद्यकिय उत्पादनाच्या आंतरप्रक्रियेत काळजी घ्यावी लागते. त्याचे निरिक्षण  इतर कंपन्यांचे अधिकारी येत नाहीत.  मात्र आता ही  परिस्थिति बदलण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कामा संघटनेला यश आले.

Post a Comment

Previous Post Next Post