डोंबिवलीत नाले सफाई करताना मेंहोलमध्ये  पडून गुदमरल्यानें 3 कामगारांचा मृत्यू



डोंबिवली ( शंकर जाधव )  :-डोंबिवलीजवळ खंबालपाडा येथे पायल मारबल्स जवळ नाले सफाई करत असताना एक कामगार मेनहोलमध्ये गुदमरला त्याला वाचवण्यासाठी दोन कामगार आत उतरले त्यामध्ये तिघेही गुदमरले व तिथेच त्यांचा मृत्यू झाला. 

    देविदास चंदर्भांन पाजगे ( ३० ) महादेव धोंडिबा झोपे (३८ ) व चंदर्भांन झोपे अशी तीन मृत कामगारांची नावे आहेत. एमआयडीसीच्या  मार्फत फेज १ मध्ये देखभाल दुरुस्तीचे काम मारबल पायल समोर खंबालपाडा येथे सुरू होते दुपारी चार साडेचारचे दरम्यान काम करत असताना ही दुर्घटना घडली तिन्ही मृतदेह पोस्ट मार्टेम करण्यासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले असून टिळकनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. ठेकेदार लक्ष्मण चव्हाण हे देखभाल दुरुस्तीचे काम करत आहेत.  एमआयडीसीचे उपअभियंता दीपक पाटील त्वरित घटनास्थळी दाखल गेले होते.याबाबत एम.आय.डी.सी.चे उपअभियंता दीपक पाटील त्वरित घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांनी दिली. या घटनेनंतर मृत कामगार राहत असलेल्या खंबाळपाड्यातील भोईरवाडीमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. या कामगारांचे मृतदेह रुग्णवाहीकेतून नेत असतांना मृतदेह पाहून नातेवाईकांचा शोक अनावर झाला होता. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून चेंबरमधून बाहेर काढलेले तिन्ही मृतदेह पुढील तपासासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविले. या घटनेची माहिती  कळताच मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत, स्थानिक नगरसेवक साई शेलार, टिळकनगर पोलीस ठाण्याचे व.पो.नि. संजय सावंत यांनी पाहणी केली. यावेळी घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. 
x

Post a Comment

Previous Post Next Post