कै.बाळकृष्ण रोहिदास भोईर यांच्या स्मरणार्थ गरीबांना दिवाळीसाठी फराळ साहित्य भेट..
डोंबिवली :- दि. २८ ( शंकर जाधव ) गरिबांची घरी दिवाळी सुखाची जावी या उद्देशाने कै.बाळकृष्ण रोहिदास भोईर यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवली पश्मिमेकडील महात्मा फुले रोडवरील मथुरा कार्यालयाबाहेर दिवाळी फराळाच्या साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे कल्याण जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक जितेन्द्र भोईर, , परिवहन समिती सदस्य शैलेंद्र भोईर, शहर ब्लाँक काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष एकनाथ म्हात्रे, गटनेते नंदू म्हात्रे, विजेंद्र भोईर, माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर आणि समाजसेवक दिपेश मेहता उपस्थित होते.
दरवर्षीच्या रितीप्रमाणे यंदाही भोईर कुटुंबाने वडिलांच्या स्मरणार्थ गरीबांना दिवाळीसाठी फराळ साहित्याची भेट दिली.यावेळी नागरिकांनी कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. सुमारे दिड हजार कुटुंबाना साखर, रवा, चना डाळ , चिवडा पोहे असे जिन्नस असलेल्या पँकिंग पिशव्यात भेट म्हणून देण्यात आले.गरिबांच्या घरातील दिवाळीलागोडधोड पदार्थ खायला मिळावे यासाठी आमचे वडील बालकृष्ण भोईर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी फराळाच्या साहित्याचे वाटप करतो असे माजी नगरसेवक जितेंद्र भोईर यांनी यावेळी संगीतले.

Post a Comment