कस्तुरी महिला भुषण, स्व.सौ.निराताई चिंतामण म्हात्रे पुरस्कार २०१८ सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत  संपन्न 

कस्तुरी महिला भुषण, स्व.सौ.निराताई चिंतामण म्हात्रे पुरस्कार २०१८ सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत  संपन्न   झाला. अतिशय छान वातावरणात दि.०७ आक्टोंबर २०१८ रोजी अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे हा सोहळा पार पडला, या सोहळ्याला आमदार डॉ. बालाजी किनीकर, नगराध्यक्षा सौ.मनिषा वाळेकर, नगरसेवक भरत फुलोरे,नगरसेविका सौ.रोहिणी भोईर, पत्रकार उक्तर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे,नगरसेविका सौ. जयश्री पाटील, नगरसेवक विलास जोशी, नगरसेवक तुळशीराम चौधरी,काँग्रेसच्या नेत्या संघजाताई मेश्राम,अंबरनाथ भाजप महिला अध्यक्ष सौ.सुजाताताई भोईर, सलिल जव्हेरी,जोसेफ, आगरी कोळी गायक दादूस,व अनेक समाजसेवक उपस्थित होते.महाराष्ट्रातल्या  नामवंत विशेष समाज कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा याप्रसंगी  पुरस्काराने गौरव करण्यात आला,या कार्यक्रमात महाराष्ट्र रत्न, आगरी समाज भुषण,जेष्ठ समाजसेवक,जेष्ठ पत्रकार, डॉ. चिंतामण रामदास म्हात्रे यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या   अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त   सर्व महिला नगरसेविका आणि समाजसेविकांनी औक्षण आणि दिर्घ  आयुष्यासाठी शुभचिंतन केले, पत्रकार उक्तर्ष समितीचे कार्यकारी अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी सर्व पाहूणे  आणि पुरस्कारार्थी यांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post