खान्देश मित्र मंडळाच्यावतीने नवरात्रोत्सवात मोफत समोसे आणि पाणी वाटप...  


डोंबिवली :- ( शंकर जाधव ) डोंबिवली पुर्वेकडील माणगाव -  मानपाडा येथील खान्देश मित्र मंडळाने भरविलेल्या न नवरात्रोत्सव २०१८ मध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी  मंडळाचे अध्यक्ष तथा युवक आघाडी डोंबिवली पूर्व अध्यक्ष विठ्ठल खेडेकर यांच्या हस्ते नागरिकांना मोफत समोसे आणि पाणी वाटप करण्यात आले.डोंबिवली आरपीआय डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड आणि डोंबिवली शहर कार्याध्यक्ष किशोर मगरे, युवक आघाडी डोंबिवली पूर्व अध्यक्ष विठ्ठल खेडकर, समाजसेवक सजिव पाटील, संजय बागुल आदि सहकार्य केले.नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी नागरिकांनी खूप गर्दी केली होती. यावेळी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह  आणि साड्या  देण्यात आली. नागरिकांना तसेच पाणी आणि समोसे वाटप करण्यात आले. यावेळी विठ्ठल खेडकर म्हणाले,आज समाजात अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी आरपीआय आणि खान्देश मित्र मंडळ प्रयत्न करत आहे. खान्देश मित्र मंडळाने आयोजित केलेल्या नवरात्रोत्सव २०१८ वात अनेकांना पाणी वाटप करून जे पुण्य मिळत आहे ते कशातही नाही. गेली अनेक वर्ष खान्देश मित्र मंडळाच्या भरवीण्यात आलेल्या  नवरात्रोत्सवाचे पहिले वर्ष आहे. देवीची आरती झाल्यावर सर्व नागरीक एकत्र येतात. विठ्ठल खेडकर आणि मंडळाचे पदाधिकारी आणि करत असलेल्या समाजकार्याची माहिती उपस्थित नागरिकांना दिली. उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिकांनी खेडकर आणि मंडळाच्या कार्यकर्त्याचे कौतुक केले. अश्या मंडळाने अधिकाधिक समाजकार्य करत रहावे असा आशीर्वादहि दिला.

Post a Comment

Previous Post Next Post