भाजपा आणि आरएसएसच्या भूमिकेशी माझा काहीहि संबंध नाही - रामदास आठवले
कल्याण :- ( शंकर जाधव )
मी जरी भाजपसोबत असलो तरी माझा भाजपा आणि आरएसएसच्या भूमिकेशी संबंध नाही. भाजपशी राजकीय असून तीदेखील निवडणुकी पुरतीच आहे असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कल्याणात सांगितले .कल्याण येथील विठ्ठलवाडी बस डेपोजवळी गंगाधर पानतावणे साहित्यनगरीत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनात आठवले आले होते.
कल्याण येथील विठ्ठलवाडी बस डेपोजवळी गंगाधर पानतावणे साहित्यनगरीत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी आठवले म्हणाले, त्यांनी मी जरी भाजपसोबत असलो तरी माझा भाजपा आणि आरएसएसच्या भूमिकेशी संबंध नाही. माझा झेंडा निळा आहे. तो मी कधीही सोडलेला नाही. भाजपसोबत केवळ माजी राजकीय यूती आहे. ती देखील निवडणूकीपूरतीच असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. तसंच पुढे बोलतांना आपल्या शैलीत `माझा हातात आहे झेंडा निळा, त्यामुळे अनेकांच्या पोटात उठला आहे गोळा` कवीता सादर केेली पुढे बोलताना आठवले यांनी सगळ्य़ांना विचारात घेऊन निर्णय घेतला आहे. यापूढेही सगळ्य़ांना विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल असे आठवले यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव, डोंबिवली शहरअध्यक्ष अंकुश गायकवाड, युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष जय जाधव, किशोर मगरे, दिनेश जाधव,तुकाराम पवार, विठ्ठ्ल खेडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment