पुण्यात उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल ???
पुणे /प्रतिनिधी, चित्रकार सचिन जुवाटकर यांने समस्त राष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची चतुर्भुज शिवप्रतिमा साकारली होती. या प्रतिमेचे प्रदर्शन दि.१०-१२-२०१८ रोजी जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतिहासकार ब.मो. पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.यावेळी शिवरायांतील दैवत्वाचा साक्षात्कारच या शिवप्रतिमेतून झाल्याचे उदगार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले होते. या चित्रामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व संपवण्यासाठीच बहुजन महापुरुषांचे दैवतीकरण केले जात आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रपुरुषास देवत्वच बहाल केले. त्यांचा पराक्रम आपोआप इतिहास जमा करता येईल हे या मागचे षडयंत्र असल्याचे सांगत चित्रकार सचिन जुवाटकर, उद्घाटक उध्दव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस'चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड'च्या वतिने 'शिवाजीनगर पोलिस स्टेशन' पुणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सन २००४ साली असेच पोस्टर, फोटो पुण्यात विक्रीला आले होते, तेव्हा पण संभाजी ब्रिगेड'ने जोरदार विरोध करून ते चित्र प्रदर्शन बंद केले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांचे संबंधित चित्रकाराने विद्रुपीकरण केले आहे व या विद्रुपिकरणाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतिहासकार ब.मो. पुरंदरे यांनी उदघाटन करून पुरस्कार केलेला आहे. तरी या राष्ट्रद्रोही घटनेला जबाबदार असणारे चित्रकार सचिन जुवाटकर,शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतिहासकार ब.मो.पुरंदरे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे, असे झाले नाही तर या पुढील काळात संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ,मीनाक्षी डिंबळे पाटील, पैगंबर शेख यांनी दिला आहे.


Post a Comment