रात्री १ वाजता पालिकेचे `ह`प्रभाग क्षेत्र कार्यालयात सुरु असलेल्या मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल ककरण्याची मागणी
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पश्चिमेकडील 'ह' प्रभाग क्षेत्र कार्यालयातील मालमत्ता कर विभाग हे रात्री १ वाजता सुरू आल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी केला आहे.हा विभाग रात्री सुरु आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मालमत्ता विभाग रात्रीच्या वेळी सुरू असणे खूप गंभीर असून कागदपत्रात फेरफार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मंगळवारी भोईर यांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांची भेट घेऊन याचा जाब विचारला.मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी भोईर यांनी केली.
रात्री उशिरा मालमत्ता विभाग सुरू असल्याने यात काहीतरी गौडबंगाल असून कागदपत्रात फेरफार तर होत नाही ना असा आरोप विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी केला आहे.याबाबत भोईर यांना विचारले असता ते म्हणाले, रात्रीच्या वेळी मालमत्ता विभागातील कार्यालय सुरू असण्यामागे कोणाचा हात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.याची दाखल पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतली पाहिजे.दरम्यान भोईर यांनी हा धक्कादायक प्रकार उजेडात आणला असला तरी हा प्रकार अनेक दिवसांपासून सूरु आल्याचे बोलले जात आहे.भोईर यांनी याप्रकारचा जाब विचारण्यासाठी प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांना जाब विचारला.असा प्रकार होणे हे गंभीर असून यांची दाखल घेतली पाहिजे. मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भोईर यांनी यावेळी केली असता कंखरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली जाईल असे सांगितले. याबाबत भोईर यांना विचारले असता ते म्हणाले, मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे पत्र पालिका आयुक्त बोडके यांना देऊ.`ह प्रभागातील असे प्रकार घडत असल्याचे उजेडात आले असून त्यापेक्षाही भयंकर प्रकार होत असतील असा आरोप केला. तसेच येत्या सर्वसाधारण सभेत हा विषय घेऊन यावर सविस्तर चर्चा करू असे देखील भोईर यांनी यावेळी सांगितले.
त्या रात्री `ह`प्रभाग क्षेत्र कार्यालयात रात्रापाळीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या चौकशीची मागणी...
शनिवारी रात्री `ह`प्रभाग क्षेत्र कार्यालयात रात्रापाळीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या चौकशीची मागणी करदात्या नागरिकांकडून होत आहे. विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी रात्री १ वाजता हे या कार्यालयातील मालमत्ता कर विभाग लाईट लावून सुरु असलेले निदर्शनात आल्यावर त्यांनी याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. यावेळी कामावर हजर असलेला सुरक्षा रक्षकहि या प्रकारात सामील होता का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचा अंकुश नसल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment