पाणी पुरवठा करणाऱ्या जांभु जलशुध्दीकेंद्रात कचरा अडकल्याने ग्रामीण भागात पाण्याची टंचाई
डोंबिवली :-  ( शंकर जाधव  ) सर्वत्र धो धो पाऊस पडत असताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या औद्योगिक विभाग व ग्रामीण भागात मात्र पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत,औद्योगिक पाणी पुरवठा मंडळाच्या जांभु येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपमध्ये कचरा अडकल्याने पाणी पुरवठयावर परिणाम झाला. त्याची सफाई करण्यासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला. यामुळे मोठया प्रमाणात पाऊस होत असताना नागरिक मात्र टकरसाठी धावप करत होते.
     औद्योगिक विभाग,निवासी भाग व २७ गावात औद्योगिक विकास मंड पाणी पुरवठा करते. मात्र २७ तारखेपासून या सर्व भागाला अचानक पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होऊ लागता.यामुळे मध्यंतरी सुरळीत झालेला पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला. २७ तारखेपासून २ तारखेपर्यत नागरिकांना पाणी अत्यंत कमी दाबाने होत असल्याने पाण्यावाचून हाल झाले. ग्रामीणभागातील अनेक निवासी संकुले ग्रमपंचायतीची परवानगी धेऊन बांधण्यात आली आहेत. ही निवासी संकुले पाणी बिले भरत नसल्याची तक्रार आहे. आयुक्त बोडके यांनी पाण्याचे भरलेले बिल दाखवा व टँकर ४०० रुपयांत न्या असे जाहीर केल्याने मोफत पाणी घेणाऱ्याची मोठी पंचायत झाली आहे पालिकेचे अधिकारी व औद्योगिक विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत असा नागरिकांचा आरोप आहे.या संदर्भात शिवसेनेचे कल्याण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे म्हणाले,गेला आठवडाभर ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई सहन करावी लागत आहे बाहेर पाऊस पडत असताना घरात मात्र पाणी नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे औद्योगिक विभाग मंड जांभु जलशुध्दीकरण केंद्राकडे बोट दाखवत असून पालिका अधिकारी मात्र काही बोलण्यास तयार नाही अशी तक्रार त्यांनी केलीडोंबिवली औद्योगिक विभागाचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे म्हणाले,गेले काही दिवस जांभु जलशुध्दीकरण केंद्रातील पाईपमध्ये कचरा,प्लास्टीक पिशव्या येऊन पाईप लाईन जाम झाली आहे. कचरा साफ करण्याचे काम सुरु असून दोन दिवसात प्रश्न मिटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तर शिवसेनेचे प्रकाश म्हात्रे यांनी आठवडाभर नागरिकांना पाण्यावाचून रहावे लागल्याने येत्या शुक्रवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला तो ठेवू नये अशी मागणी त्यांनी औद्योगिक पाणी पुरवठा मंडळाकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post