पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा मुलांचा बुडून मृत्यू
टिटवाळा : बल्याणी उंभर्णी रोडला नांदप हद्दीत एल.एन. स्कूल परिसरात शेतातील डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
नांडप गावाच्या परिसरातील चाळीतील काही मुले एल.एन. स्कूलच्या समोर असलेल्या शेतातील पाणी साचून तयार झालेल्या डबक्यात पोहण्यासाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे व सदर डोहात गाळ असल्याने यातील मयंक शर्मा, (12) व पियुष पाठक (13) ही दोन मुले बुडाली. इतर मुलांनी या घटनेची खबर मुलांच्या नातेवाइकांनी दिली. नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलांची शोधाशोध केली. परंतू खुप वेळ शोधून देखील दोन्ही मुलं सापडली नाहीत. दुपारी चार वाजता या दोन्ही मुलांचे मृत्यू देह पाण्यावर तरंगत आले. टिटवाळा पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुक्मिणी रुग्णालयात पाठविले आहे . या घटनेचा अधिक तपास टिटवाळा पोलीस करत आहेत.


Post a Comment