रेल्वे अपघातात आठ महिन्यात झाले ९९ बळी


डोंबिवली :-  ( शंकर जाधव ) डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हददीत काल रात्री अप्पर कोपर रेल्वे स्थानकावर अनुज विरेंद्र विश्वकर्मा (१८) नावाचा तरुण अप्पर कोपर रेल्वे स्थानकावरुन क्रॉस करत असताना अज्ञात लोकलच्या धडकेत सोमवारी रात्री साडेबाराचे सुमारास मध्यरात्री मृत पावले. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी २०१९ पासून ते १२ ऑगस्ट या कालावधीत एकूण ९९ जणांचे बळी गेले.विश्वकर्मा हा नांदिवली येथील रहिवासी होता.
      डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हददीत वसई,जुचंद्र,कोपर,भिवंडी,बापगाव,कामण,डोंबिवली ठाकुर्ली व अप्पर कोपर अशी रेल्वे स्थानके असून पोलीसांना सुविधा मित नसल्याने जखमी प्रवाशाला आणण्यासाठी स्ट्रेचर,रुग्णवाहिका,हमाल आदिंची सोय नाही काल रात्री अप्पर कोपर रेल्वे स्थानकावर काल रात्री झालेल्या अपघातात तरुण अपघातात जखमी झाल्यानंतर त्याला तेथेून आणण्यासाठी हमाल मित नाही इतर सुविधा नाही तसेच दिवा -वसई रेल्वे मार्गावर मर्यादित ट्रेन धावत असल्याने रेल्वे पोलीसाना जखमी प्रवाशाला आणण्यासाठी पायपीट करावी लागते. या मार्गावर वेळेवर उपचार मिळाले. तरप्रवाशांचे प्राण वाचू शकतील मात्र त्याच मित नसल्याने अपघातात बळीची संख्या वाढत आहे. यासंदर्भात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण सतीश पवार यांना विचारले असता त्यांनीलोहमार्ग पोलीस आपले काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगीतले.

Post a Comment

Previous Post Next Post