पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील पी ओ पी छत पडले...
डोंबिवली विभागीय कार्यालय धोकादायक असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष...
डोंबिवली- ( शंकर जाधव) कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील पी ओ पी छत पडले. १० फेब्रेवारी १९८० साली या कार्यालयातील सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे.मात्र पालिकेचे हे कार्यालयात जीर्ण अवस्थेत झाल्यामुळे छत कोसळले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी फडके रोडवरील अंबिका हॉटेलची इमारत जीर्ण झाल्याने त्याचेही पी ओ पी छत पडले होते.त्यानंतर आठवड्याभरात ही इमारत पालिकेने जमीनदोस्त केली.आता पालिकेच्या या कार्यालयातील इमारतही धोकादायक झाल्याने या इमारतीबाबत पालिका प्राशसन लवकरात लवकर काय निर्णय घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment