कोळसेवाडी पोलिस ठाण्यात राडा प्रकरण भाजप आमदाराला भोवणार ; किरकोळ गुन्हे दाखल झाल्याने एस.आय.टी . मार्फत चौकशीची मागणी .....संघटना महासचिव रमेश पौळकर झाले आक्रमक

 


कल्याण : (रोशन उबाळे) कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शाहूराजे साळवे यांना उपमर्द व मानभंग करून अपमानित करणाऱ्या भाजप आमदार गणपत गायकवाड  यांच्यावर  सरकारी कामात अडथळा आणि अट्रोसिटी दाखल करण्यासाठी मागासवर्गीय संघटनांनी  दंड थोपटले आहे   स्थानिक  पोलीस प्रशासनाने  विसंगत आणि  किरकोळ  स्वरूपाचे गुन्हे  दाखल करून ४० ते ५०  आमदार समर्थकांचे नावे  तक्रारीत नोंद नाही  राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे सक्षम पोलीस अधिकारी किंवा एस.आय.टी  मार्फत चौकशी करण्याची मागणी अनुसुचित  जाति/ जनजाती संघटना अखिल भारतीय परिसंघाचे महासचिव रमेश  पौळकर  यांनी केली आहे त्यामुळे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात राडा    प्रकरण गुन्हा दाखल झालेल्या आमदाराला भोवणार अशी शक्यता निर्माण होत आहे .

  कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात   जमिनीच्या वादाचे प्रकरण आले होते त्यावेळी  तक्रार घेतली नाही म्हणून वाद झाला होता  हे प्रकरण बिल्डर आणि भाजप नगरसेवक मनोज राय  आणि गजानन म्हात्रे  यांच्या वाद झाला होता  त्या संदर्भात  कारवाई सुरू असताना  नगर सेवक आणि त्याच्या मुलांना कोठडीत का? डांबले यावरून वाद सुरू झाला त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड आणि ४० ते ५०    समर्थक आणि कार्यकत्ये  यांनी  शिरकाव  पोलीस ठाण्यात करून अरेरावी करीत जाणीवपूर्वक उपमर्द , दरोड्या"पैश्यांसाठी काम करतोस असे बोलून  मानभंग करून सार्वजनिक ठिकाणी धमकावून अपमान पानउतारा करत सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आपराधांविरोधात  ३५३ आणि फिर्यादी अनुसूचित जाती सदस्य असून  अट्रो सिटी  गुन्हा दाखल  केला नाही . त्यामुळे   तक्रारदार रमेश पौळकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य एससी-एसटी आयोग , अतिरिक्त पोलीस आयुक्त  , सहाय्यक पोलीस आयुक्त आणि तहसीलदार यांच्याकडे  पत्रव्दारे  या गुन्ह्याचा समावेश करून कारवाई करण्याची मागणी केली आहे  . त्यानंतर स्थानिक पोलिसांनी आपल्याच सहकार्याला मदत करण्याऐवजी  विसंगत आणि किरकोळ ,सौम्य गुन्हे दाखल केले आरोपीवर  संदर्भ लक्षात घेता  पुन्हा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख   सक्षम पोलीस अधिकारी किंवा एस.आय.टी  मार्फत चौकशी करण्याची मागणी  केली आहे . 

 

            तात्काळ तहसीलदार दीपक आडके यांनी पत्राचे संदर्भ घेत , जिल्ह्यधिकारी यांच्याकडे आवश्यक त्या कारवाई साठी पाठविले आहे त्याचे पत्र पौळकर याना दिले आहे .दरम्यान  आमदाराने पोलिसांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात  खराब केल्याची संभाषणाची  विडिओ  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे   आणि जनमानसात पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी घटनेतील आरोपींवर  कठोर कारवाई होण्यासाठी संघटनेव्दारे  तक्रार केली असल्याची माहिती रमेश पौळकर यांनी दिली .  संविधान सर्वांनसाठी सारखे आहे  आमदार असो की सर्वसामान्य नागरिक  त्यामुळे  फिर्यादी  कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  निरीक्षक  शाहूराजे  साळवे  यांच्या वर अन्याय होऊ नये म्हणून  अन्याय विरोधात मैदानात उतरलो आहे अशी प्रतिक्रिया रमेश पौळकर यांनी दिली .

 

 

Post a Comment

Previous Post Next Post