रोशन उबाळे - कल्याण : कल्याण पूर्व सर्वात प्रभावित कोरोना संसर्गाने झाला आहे काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण येत असताना ड प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे करण्यासाठी कामगारांची झुंड केली जात आहे त्यामुळे कोरोना संसर्ग वाढविण्यात अनाधिकृत बांधकांमाचा हात असल्याचे दिसून येत आहे याच काळात प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांची मोठी चंगळ झाली आहे कोरोनाचा कारण सांगत कारवाई न करता चाळी , आरसीसी , लोडबेरिंग, मोक्याची ठिकाणी इमारत उभ्या राहत आहेत या उभारी ला एकमेव जाणून बुजून अनभिज्ञ वृत्ती ठेवणे त्यामुळे प्रभाग कार्यालय अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याची दिसून येत आहे.
पूना लिंक रोड वर अनेक इमारती रस्ता रुंदीकरणाचा केविलवाणा कारण पुढे करत अनेकांनी आर.सी.सी. आणि लोड बेरींग बांधकामे जोरात सुरू करून पूर्ण केली आहेत खडेगोलावली मध्ये प्रवेश व्दाराजवळ ठेकेदार शिपाई लोड बेरिंग व्यापारी गाळे आणि ममता मेडिकल्स मालकाने तर दोन मजले मोठ्या दिमाखात उभे केले आहेत तर खडेगोलावली नाल्यालागत ठेकेदार महेंद्र यादव याने तर निवासी वस्तूची व्यावसायिक गाळ्यात रूपांतर करीत मेन पुलाजवळ लोडबेरिंग काम सुरू होऊन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे याचे श्रेय ड " प्रभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना जाते त्यात प्रभाग क्र . ९५ नेहरू नगर मध्ये तर मेन रस्त्यावर बेकायदेशीर व्यापारी गाळे बांधण्याचे काम विक्रमी मार्गावर आहे त्यामुळे या भागात अनाधिकृत बांधकामे बघून कोरोना शिरकाव करतांना मुभा देते की काय असे विचार उभी बांधकामे पूर्ण होतांना वाटते.
दरम्यान प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांनी आपल्या ठेवणीतील उत्तरे देत तक्रारकर्त्यांची बोळवण करताना दिसतात आणि फक्त कागदी घोडे नाचवत वेळ मारू नेत आहेत .

Post a Comment