अकोले/भंडारादरा.
प्रतिनिधी.वैभव बुळे
ग्रामीण भागातील गुणवान आणि क्षमता असलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत संधी मिळावी, या मुख्य हेतूने भंडारदरा येथे प्रचिती क्रिकेट क्लबच्या वतीने भरविण्यात आलेल्या हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन युवा उद्योजक किरणदादा लांडे व सरपंच पांडुरंग खाडे यांच्याहस्ते शासकिय वसाहतीच्या मैदानावर करण्यात आले. स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्यांना रोख परितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेत भंडारादरा आणि परिसरातील ४० संघांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेसाठी किरण लांडे, संघर्ष क्रिकेट क्लब शेंडी, यश hp गॅस वितरक भंडारदरा, रामनाथ आरोटे, बोटिंग क्लब भंडारादरा यांनी मोलाचे सहकार्य केले आहे उद्घाटनावेळी भंडारदरा गावचे सरपंच पांडुरंग खाडे, युवा उद्योजक किरण लांडे, उद्योजक उमेश आवसरक, किसन आंबवने, बोटींग क्लबचे अध्यक्ष प्रकाश खाडे, माजी क्रिकेटपटू विठ्ठल चंदर खाडे, माजी सरपंच चिंधु खाडे उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोरख पटेकर, पांडुरंग खाडे, किशोर खाडे,अजेय खाडे, गणेश चौधरी, अक्षय खाडे, मच्चींद्रा भोईर यांनी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment