अजय भरसट
शिरपूर : तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील असलेले सांगवी येथील पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पदभार घेणारे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री.सुरेश शिरसाठ साहेब ह्यांचे जय आदिवासी युवा शक्ती (जयस) महाराष्ट्र शिरपूर तर्फे सन्मान व सत्कार करण्यात आले. ह्यावेळी तालुक्यातील ग्रामीण आदिवासीबहुल क्षेत्रातील अनेक अडचणींवर व तालुक्यातील सध्यपरिस्थितींवर चर्चा करण्यात आली व समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवनियुक्त अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
ह्यावेळी सत्कार करतांना जयस महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा, जयस शिरपूर उपाध्यक्ष जगदीश पावरा, जयसचे मार्गदर्शक शब्बीर पावरा सर, पवन पावरा सर, डॉ.मंगेश बर्डे, आकाश पावरा उपस्थित होते. ह्यावेळी साहेबांनी जयस शिरपूर टीमचे आभार मानले.

Post a Comment