प्रतिनिधी विजय सुपे आंबिवली
बुधवार दि २४.२.२०२१रोजी मौजे सोमाज ता.इगतपुरी जि.नाशिक. याथे आदिवासी संस्कृती जपली पिढीजात पंरपरा.
असली तरी हल्लीच्या धावत्या युगात नव्या पिढीने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.आणि परिधान करणाऱ्या महीलांची संख्या कमी झाल्यामुळे बाजारात फडकी उपलब्ध होणे कठीण होऊन बसले आहे.आणि फडकीच्या झेंड्याखाली एकत्र आलेला माझा आदिवासी समाज?जर एक दिवस फडकीच नामशेष झाली तर काय करणार??
या अनुषंगाने मौजे सोमज गावचे युवा सरपंच मच्छिंद्र कुंदे यांनी फडकी परीधान करणाऱ्या महीलांचा विशेष सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केला.गावात अगदी बोटावर मोजण्याइतक्याच वृध्द महीलांखडे फडकी बघायला मिळत होती, परंतु या उपक्रमामुळे जवळपास साठ महीलांनी फडकी परिधान करून कार्यक्रमात सहभाग नोंदवला.त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इगतपुरी पंचायत समितीचे सभापती मा.सोमनाथ भाऊ जोशी यांच्या हस्ते महीलांचा सत्कार करण्यात आला.तसेच गावात घरच्याघरी बाळांतपण करणारी एकच वृध्द म्हातारी असून तिने गेल्या पन्नास वर्षांपासून कित्येक महीलांचे घरच्या घरी अगदी उत्तम पध्दतीने बाळांतपण करून आजची आमची पिढी घडवली त्या आजीचा पण सत्कार करण्यात आला.व शालेय शिक्षण परिक्षेत इयत्ता दहावीच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात मोगरे गावचे प्रताप भाऊ जाखेरे, गोविंद जाखेरे,आदी मान्यवर उपस्थित असुन संकल्प ग्रामविकास समितीचा,तसेच ग्रामपंचायत उपसरपंच,ग्रामसेविका, सदस्य,सर्व शिक्षक वृंद,व गावातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असुन मोलाचा वाटा होता.


Post a Comment