*"मराठा क्रांती ठोक मोर्चामार्फत भिवंडी बंदची हाक...."*



प्रतिनिधी- कल्पेश कोरडे

दि.२५ जुलै(भिवंडी)
....................५८ शांत आणि शिस्त प्रिय संपूर्ण *"जगाने दखल घेतलेल्या पण फडणवीस सरकारने दखल न घेतलेल्या"* लाखोंच्या मराठा क्रांती मोर्चाचे आज *"२५ जुलै रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चा चे आज संपूर्ण महाराष्ट्रा सहीत मुंबई ठाणे- आणि जिल्ह्यातील सर्वात अति असहनशील विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी तालुक्यात सुद्धा "मराठा क्रांती ठोक मोर्चा" चे प्रतिसाद उमटले...*

आणि ठोक मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र बंद ची हाक मुंबई-ठाणे-आणि भिवंडी विभागात ही यशस्वी पणे पूर्ण झाली.

*"भिवंडीतील अगदी शिस्त प्रिय आणि कोणत्याही प्रकारच्या सरकारी व खासगी मालमत्तेच नुकसान न करता"* सदरिल  आंदोलनामार्फत *"स्वर्गिय (मराठा बांधव) काकासाहेब शिंदे यांना समस्त भिवंडी वासी , व मराठा क्रांती ठोक मोर्चा भिवंडी कडून श्रद्धांजली वाहण्यात आली."*

दरम्यान मराठा क्रांती ठोक मोर्चाचे स्वागत करित सर्व भिवंडीत बंद पाळण्यात स्थानिक जनतेने व पोलिस प्रशासनाने मोलाचे कार्य केले...

पण यावेळी काही राजकीय नेत्यांना अर्थातच भाजपाचे आमदार महेश चौघूले यांना संभाजी ब्रिगेड व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्ते यांचा रोष सहन करावा लागला....!
व *"आत्तापर्यंतच्या सहा अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात कोणत्याही प्रकारचे भाष्य न करण्याचे कारण स्पष्ट करा...?"*
    अशा अनेक ना अनेक प्रश्नांना मा.आमदार महेश चौघुलेंना सामोरे जावे लागले.
तसेच सदरिल आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास यापुढील आंदोलन अधिक तीव्र करु असा ठोस इशारा आंदोलन कर्त्यांनी प्रसार माध्यमातून सरकारला दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post