*सकल मराठा मोर्चाकडून मुंबई,ठाणे, नवी मुंबई येथील आंदोलन स्थगित...*                                            
 मराठा क्रांती मोर्चाकडून  पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील आंदोलन स्थगित करण्यासंदर्भात घोषणा केली.
काल सकाळपासून शांततेत पार पडलेल्या मोर्चाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. नवी मुंबईतील कळंबोली येथे एस. टी जाळण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना लाठीमार करावा लागला.पोलीस आपली यंत्रणा कामाला लावत परिस्थिती नियंत्रणात आणत होते.सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील परळ, कुर्ला, मुंबई सेंट्रल येथील एसटी आगार बंद ठेवण्यात आले होते . त्यामुळे गावाकडे जाणाऱ्या अनेक प्रवाश्यांचे हाल झाले.               
कल्याणसह टिटवाळयात देखील  कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा क्रांती मोर्चेकर्यांनी केलेल्या हिंसक वळण लागल्यानंतर ठिक ठिकाणच्या समन्वयकांची एकत्रित बैठक घेउन  आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. या आंदोलनाचा चेहरा घेउन त्यामागुन काही समाजकंटकांनी हिंसाचार घडवल्याचा देखील समन्वयकांकडून सांगण्यात आले .                






























              

 *मुंबई डेटलाईन 24..*


Post a Comment

Previous Post Next Post