कल्याण:-गौरीपाडा कल्याण पश्चिमेत ड्रीम होम्स् येथे सार्वजनिक गणेशोत्सव संपन्न



( मुंबई डेटलाईन 24 : प्रतिनिधी - दत्ता बाठे )



ड्रीम होम सर्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे पहिले वर्षे असुन मंडळाने इकोफ्रेंडली सजावट करताना 
रद्दी वर्तमान पत्राचा तसेच बांबूच्या कनातीचा वापर करीत नैसर्गिक रंगाघा वापर करीत पुरातन गुहा बनवून गणरायाला गुहेत विराजमान केले होते. सजावटीची संकल्पना कु. स्विटी चित्ते तसेच सजावट सहय्य मुलीनी महिला वर्गाने करुन गुहा साकरण्यात आली.  यातुन पर्यावरण जतनचा संदेश दिला गेला.   पुजेची बाल गणेशाची मुर्ती भक्ता सह  बालकांना आकर्षण करीत मन वेधावुन घेत होती. उत्सावा दरम्यान भजन पुजन,आरती व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गणेश भक्ताची मांदियाळी होती. ड्रीम होम्स् सर्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार नरेंंद्र पवार ,स्थानिक भाजपा  नगरसेवक दया गायकवाड, युवासेना पदा्धिकारी मा. नगरसेवक सुनील वायले,   मनसे पदा्धिकारी मा.नगरसेवक उल्हास भोईर, खडक पाडा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम आदी मान्यवरांनी भेट दिली होती. उत्सव कालावधी मध्ये महाप्रसादाचे आयोजन सत्यनारायण पुजेनिम्मत करण्यात आले होते. यानिमित्त महाप्रसादाचा लाभ शकडो भाविकांनी घेतला.  गौरी गणपती विर्सजनाच्या दिवशी शिस्तबद्ध रित्या हजारो भाविकाच्या उपस्थितीत भावपुर्वक,श्रेध्देने मंडळाने.बाप्पाचे विर्सजन करीत "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या"  असा उद्दघोष केला.  गणेशोत्सवच्या यशस्वी होण्यासाठी ड्रीम होम्स् सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर जाधव,तसेच पद्दाधिकारी  सुदेश गोरेगावकरनामदेव ऐखंडे, महेश चौधरी, सागर निकम ,गणेश चौधरीविनायक माने, रिर्चड नाडर,   साईनाथ म्हात्रे,       रवी अनावकर ,नवनाथ जाधव, दिपक गावडे,    ओमकार बाठेआदी सदस्यांनी तसेच ड्रीम होम्स् महिला वर्गानी  प्रचंड मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post