कल्याण :
कल्याण ग्रामीण भागात असलेल्या कल्याण- मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील रायते गावात आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष सुदाम भोईर व भरत दळवी युवा विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून रायते गावातील गरजू व गरीब महिलांना मायेची ऊब असलेल्या ब्लॅंकेटचे व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी रेड स्वस्तिक सोसायटीचे महाराष्ट्र राज्य जनसंपर्क संचालक व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्वछतादूत प्रमोद नांदगावकर , कल्याणच्या माजी सभापती माधुरी वालिंबे, कल्याण तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख मधुकर वालिंबे, रायते पिंपलोली ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्या करिष्मा सुरोशी, माया सुरोशी , नारायण सुरोशी, वकील मनोज सुरोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण तालुका उपाध्यक्ष विलास सोनावणे, विजय कार्ले, स्वामी बचत गटाच्या सुवर्णा सुरोशी , किशोरी भोईर व इतर मान्यवर, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत दळवी यांनी केले. यावेळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलन करून व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आदर्श मित्र मंडळाच्या वतीने प्रमोद नांदगावकर, करिष्मा सुरोशी व माया सुरोशी यांचा सन्मान करण्यात येवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेतली.

Post a Comment