इंधनदरवाढीविरोधात डोंबिवलीत विविध  राजकीय पक्षांची निदर्शने ...


डोंबिवली :- ( शंकर जाधव  ) इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस पार्टीने पुकारलेल्या बंदमध्ये विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता. डोंबिवली शहरात झालेल्या आंदोलनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय कम्युनीट पक्ष ( माक्सर्वादी ), बहुजन समाज पार्टी यांनी जोरदार निदर्शने केली.मनसेने बैलगाडीतून मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध केला. तर बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी हे सरकार डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेची भाजप सरकार पायमल्ली करत आहे असे यावेळी सांगितले.पुकारलेल्या  बंदला डोंबिवलीत उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.

   सातत्याने वाढत असलेल्या इंधन वाढीविरोधात कॉंग्रेस पार्टीने सोमवारी भारत बंदीची हाक दिली होती. सकाळ पासून रिक्षा आणि दुकाने बंद होती. डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात कॉंग्रेस पार्टीचे कल्याण जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर, ब्लॉक अध्यक्ष गंगाराम शेलार, नगरसेवक नंदू म्हात्रे, प्रतिनिधी संतोष केणे,माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे, माजी नगरसेविका शारदा पाटील, नगरसेवक हृद्यनाथ भोईर, समन्वयक गणेश चौधरी , एकनाथ म्हात्रे, रमेशचंद्र जैन, नवीन सिंग, सदाशिव शेलार, रवी पाटील, हर्षद पुरोहित, अजय पौळकर, अशोक कापडणे, राधिका गुप्ते,विजय जाधव, अमित म्हात्रे, अभय टावरे, पाॅली जेकब आदी कार्यकर्ते सहभागी झाले हो भारतीय कम्युनीट पक्ष ( माक्सर्वादी )चे माजी सचिव काळू कोमास्कर यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी इंदिरा चौकात मोदी सरकार  जनतेची दिशाभूल करत आहे, जनतेला खोटे आश्वासन देत आहे असे सांगत सरकारचा निषेध केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपाध्यक्ष राजेश कदम, जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर,महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील. माजी नगरसेविका सरोज भोईर,मनविसे डोंबिवली शहराध्यक्ष सागर जगे, ओम लोके, शशिकांत कोकाटे  आदी पदाधिकारी आणि  कार्यकर्ते यांनी बैलगाडीतून मोर्चा काढून निषेध केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी समीर भोईर आणि पूजा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे सरकार फसवे असल्याचे सांगत निदर्शने केली.



YOUTUBE 

Post a Comment

Previous Post Next Post