शिवसेना शाखा क्र.६४, जुनी डोंबिवली दहीहंडी उत्सव साजरा.
डोंबिवली प्रतिनिधी : ( शंकर जाधव)
शिवसेना शाखा क्रमांक - ६४ जुनी डोंबिवलीच्या वतीने दहीहंडी उत्सव २०१८ उत्सवात हंडी फोडण्याचा मान हिंद गर्जना मित्र मंडळाला मिळाला. मंडळाचे अध्यक्ष पंकज सुर्वे व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना शिवसेना शाखेचे उपविभागप्रमुख बाळू ठाकूर, उपशाखाप्रमुख प्रकाश खाडे, अंबिकानगर शिवसेना शाखाप्रमुख श्रीकांत बिरमोळे, एसी कंपनीचे मालक अख्तरभाई चौधरी,गटप्रमुख स्वप्नील गोनभरे यांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह देण्यात आले . यावेळी कार्यालयप्रमुकग अशोक चव्हाण, शिवसैनिक मंगेश माळवदे, साईनाथ खनपट, अतिश म्हात्रे, विपुल म्हात्रे, नितीन गायकवाड, हितेश मुरादे, कुणाल सिंग, राहुल सिंग, परेश खनपट, रोहित गायकवाड, विनय ढगे, कुणाल गायकवाड, तुषार देसाई, प्रथमेश चव्हाण दत्ता हुंबरे, दर्शन परब यांच्यासह अनेक शिवसैनिक, युवासैनिक, आणि नागरिक उपस्थित होते. आकर्षक सन्मानचिन्ह बनवून दिल्याबद्दल भाग्यश्री बुधावळेकर यांच्या शुभ क्रिएशन मोबाईल यांचे आभार मानले.

Post a Comment