आपघातात प्रभाकर पाटील यांचे दुःखद निधन
टिटवाळा:- पत्रकार उमेश जाधव यांच्या मोठ्या बहिणीचे पती कै. प्रभाकर गणपत पाटील यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाटील व जाधव कुटूंबावर दुःखाचे सावट कोसळले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की कै. प्रभाकर गणपत पाटील हे मुळेच वाडा तालुक्यातील कुडूस जवळील गुंज काटी येथील रहिवासी. गेली 26 वर्षा पासून ते टिटवाळा येथे आपल्या कुटूंबासह राहतात. रिलायन्स कंपनीत ते काम करत होते. तो जाॅब सुटल्या नंतर ते गेली तीन वर्षा पासून वाडा जवळील अल्ट्रा टेक कंपनी मध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. सध्या ते आपल्या कुडूस जवळील काटी गावातील घरी राहून कंपनीत कामाला जात होते. आठवडा व पंधरा दिवसातून ते रविवारी सुट्टीच्या दिवशी टिटवाळा येथे येत असत. कारण रोज इतक्या लांबून घरी येणे शक्य नसल्याने ते आपल्या आईकडे रहात होते. शनिवारी नेहमी प्रमाणे ते कंनीत कामावर गेले. सायंकाळी सहाच्या सुमारास ते कामावरून आपल्या दुचाकीवरुन घरी येत असताना वाडा-भिवंडी या मार्गावर पाहुनी पाडा येथे मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. बराच वेळ मृत्यूदेह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. काही तरूणांनी त्यांना उचलून वाडा येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ.घुगे यांनी त्यांना तपासून ते मयत झाले असल्याचे सांगितले.
हा अपघात एखाद्या मोठ्या वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्याने पाटील यांची दुचाकी सदर वाहनावर मागून येऊन धडकल्याने झाला असल्याचे पाटील यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, मुली, सुन व जावई, आई व चार भावंडे असा परिवार आहे. या घटने संदर्भात वाडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Om Mani padme Hun,prabhakar Patil ha raja Manus hota....ekdam hassun rahanar ,te amchya society che maji aadhyaksha hote..tyanchya ase jannane Amala khup dukha zale ahe...tyanchya parivar chya dukhat amhi sarve sahabhagi ahot.
ReplyDeletePost a Comment