ड्रग्स विरोधात अंबरनाथ येथे साऊथ इंडियन डिग्री कॉलेज विद्यार्थ्यांची रॅली
अंबरनाथ :- एस.आय.सी.इ.एस. द्वारा संचालित डिग्री कॉलेज च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज विद्यार्थ्यांनी अंबरनाथच्या पश्चिमेकडील महात्मा गांधी चौकापासून अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या ईस्ट तिकीट काउंटर पर्यंत ड्रगसच्या विरोधात रॅली काढली तसेच अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या ईस्ट तिकीट काउंटर जवळ पथनाट्य सादर करून जनजागृती ही करण्यात आली.
सध्या युवा वर्गांमध्ये विविध प्रकारच्या व्यसनाचे प्रमाण वाढले असून यात कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. आजचा युवक ज्या वेगाने व्यसनाच्या दिशेने जात आहे ते देशाच्या भविष्यासाठी चिंतेची बाब आहे, म्हणूनच याबाबत जनजागृती करण्यासाठी साऊथ इंडियन डिग्री कॉलेजच्या सेवा योजना विभागातर्फे सदर रैलीचे आयोजन करण्यात आले होते. या रैली मध्ये विद्यार्थ्यांनी देशाच्या युवकांना व्यसनमुक्तीचे आवाहन केले. सदर कार्यक्रम कॉलेज प्राचार्य डॉ.हर्षल बच्छाव, कार्यक्रम अधिकारी डॉ.योगेश शेलार, मुद्दसर सय्यद, नीलम जैस्वार, विशाल शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्याची माहिती योगेश चलवादी यांनी दिली.

Post a Comment