भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव परेश गुजरे यांची मिरा भाईंदर जिल्हा प्रभारी पदी  नियुक्त्ती 


टिटवाळा : भाजपाच्या नेतृत्व शैलीने प्रभावित झालेले  परेश गुजरे हे भाजपात सक्रियपणे कार्य करू लागले . त्यांची काम करण्याची वेगळी  शैली , दांडगा जनसंपर्क, युवा वर्गांचा त्यांच्यावर असलेला विश्वास या साऱ्यामुळे  तसेच भाजपाने त्यांच्यातील प्रामाणिक राष्ट्रभावना आणि त्यांच्यात असलेला नेतृत्वगुण हेरून काही महिन्यांपूर्वीच युवा मोर्च्याच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली. नवनवीन  जबाबदारी घेऊन ती सक्षमपणे निभावण्याच्या त्यांच्या खास कार्यशैलीमुळे भा. ज. यु. मो राष्ट्रीय सचिव वोलेंटिअर प्रोग्रामच्या महाराष्ट्र सहसंयोजकपदीही  त्यांची निवड झाली . नवनवीन कल्पना राबवत सक्षमपणे आपली जबाबदारी निभावत असतानाच आता पक्षाने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन आता मिरा भाईंदर जिल्हा प्रभारी पदी  नियुक्त्ती केली आहे. त्यांच्या या नवीन नियुक्तीबद्दल पक्षांतून व त्यांच्या वलयातील  युवा वर्गांकडून , त्याचबरोबर महाराष्ट्रभरातील पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांकडून त्यांना शुभेच्छा  दिल्या जात आहेत. 



Post a Comment

Previous Post Next Post