आता नागरिकांना
भाडेवाढीला`बस` म्हणण्याची वेळ
..
रिक्षाभाडे पाठोपाठ
बसभाडे वाढणार ...
डोंबिवली ( शंकर जाधव ) इंधन दरवाढीमुळे डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी २ रुपयांनी
रिक्षाभाडेवाढ केल्याने डोंबिवलीकरांनी नाराजी व्यक्त केली होती. आता केडीएमटीचा
प्रवासहि किमान १ रुपया ते कमाल ५ रुपयापर्यत वाढणार असल्याने नागरिकांना
भाडेवाढीला`बस` म्हणण्याची वेळ
आली आहे. गुरुवारी पार पडलेल्या
परिवहन समितीच्या सभेत प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन सभेत पटलावर मंजुरी
साठी सादर करण्यात आला.समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली असली तरी भाडे वाढीचा
प्रस्तावाची अंमलबजावणी महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर केली होणार आहे.
इंधनाचे दर
वाढल्याने परिवहनला मिळणाऱ्या ऐकून उत्पन्नापैकी ५५ टक्के उत्पन्न इंधनावर खर्च
केला जात असल्याचे या सभेत सांगण्यात आले.केडीएमटी उपक्रम डबघाईला आला असून
उपक्रमातील २१८ गाड्यापैकी केवळ ७० गाड्या रस्त्यावर धावतात. नियमित देखभाल
दुरुस्तीसाठी पैसा नसल्यामुळे बंद पडलेल्या गाड्या दुरुस्ती अभावी आगरात उभ्या
आहेत. तर उपलब्ध असलेल्या चालक वाहकांची क्षमता पाहता यापेक्षा जास्त गाड्या बाहेर
काढणे शक्य नसल्याचे परिवहन कडून सांगितले जात आहे. त्यातच वाहतूक कोंडीमुळे
फेऱ्या रोडावल्या असून त्याचाही परिणाम उत्पन्नावर होत असल्याचा दावा परिवहन
प्रशासनाकडून करण्यात करण्यात आला.इंधनाचे दर वाढल्याने परिवहनला मिळणाऱ्या ऐकून
उत्पन्नापैकी ५५ टक्के उत्पन्न इंधनावर खर्च करावा लागतो. त्यातच सुट्या भागाची
देखील दरवाढ झाल्याने दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. त्यातच शहरातील वाहतूक कोंडीमुळे
दररोज परिवहनला दीड लाखाचे नुकसान सहन करावे लागत आहे. हा दररोजचा तोटा कमी
करण्यासाठी परिवहन कडून भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून किमान १ रुपया ते
कमाल ५ रुपया पर्यतची भाडेवाढ परिवहन कडून प्रस्तावित करण्यात आली असून आज हा
प्रस्ताव परिवहन समिती पुढे ठेवण्यात आला होता.समितीने या भाडेवाढीला सभेत मंजुरी दिली.
शासनाच्या अधिसूचने नुसार सार्वजनिक वाहतूकीसाठी आकारली जाणारी भाडेवाढ गृहीत धरून
त्यापेक्षा अधिक भाडे प्रवाशांना आकारले जाणार नाही याची दक्षता घेत हा प्रस्ताव
तयार करण्यात आल्याचे स्पष्टीकरण परिवहन महाव्यवस्थापक मारुती खोडके यांनी
दिले.मात्र सध्या डबघाईला आलेल्या परिवहनला काही प्रमाणात आधार देण्यासाठी भाडेवाढ
अनिवार्य असल्याचे प्रशासनासह परिवहन सदस्याचे म्हणणे आहे.यामुळे सदस्यांनी
एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला असून हा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी धाडण्यात
आला आहे.यामुळे नागरिकांना परिवहनची भाडेवाढ सहन करावी लागणार आहे.
Post a Comment