जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे ' दैनिक जनादेश पुरस्कार-२०१८ ' ने
सन्मानित.
ठाणे : आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ठाणे पालघर यांसह
दुर्गम आदिवासी पाड्यांत त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक समाजबांधवांच्या
कल्याणासाठी आरोग्य,
शिक्षण, क्रीडा, शेतकरी व महिला सक्षमीकरण व आदी सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देऊन
महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश
भगवान यांना सन २०१८ या वर्षीच्या "दैनिक जनादेश पुरस्काराने" सन्मानित
करण्यात आले. गडकरी रंगायतन येथे झालेल्या भव्य दिव्य समारंभामध्ये अनेक
मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे, प्रेक्षकांचे व दैनिक जनादेश परिवाराचे निलेश सांबरे यांनी आभार मानले.

Post a Comment