२८ वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या खुनाचा घेतला बदला ???
डोक्यात दगड घालून केली युवकाची हत्या ....
कल्याण तालुक्यातील पावशेपाडा येथील घटना ...
टिटवाळा:- कल्याण तालुक्यातील पावशेपाडा येथे दिवाळी पाडव्याच्या
संध्येला भालचंद्र पावशे (35) या तरुणाचा खुन झाल्याची घटना घडली आहे. सदर आरोपीला पोलीसांनी ताब्यात
घेतल्यानंतर सागर पावशे (34) याने हा खुन केला असल्याचे
पोलीसांसमोर काबुल केले.
गुरूवारी दिवाळी
पाडव्याच्या दिवशी सायंकाळी ३ ते ५ वाजेच्या दरम्यान कल्याण
तालुक्याच्या टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावशे पाडा या ठिकाणी असलेल्या पावशे पाडा येथली रहिवाशी असलेल्या भालचंद्र
पावशे या युवकाची डोक्यावर व तोंडावर दगडाने
ठेचून हत्या करण्यात आली. आरोपी सागर पावशे याने मयत भालचंद्र पावशे याला संजय गावंडे यांच्या वरप येथील फार्म हाऊसवर नेऊन दारू पाजली व मयात भालचंद्र हा दारुच्या असताना डोक्यात दगड
घालुन त्याचा खून केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी दाखल होत त्यांनी मृत्यूदेह ताब्यात घेत
उल्हासनगर येथील मध्यवर्ती रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे हे देखील
घटनास्थळी दाखल झाले होते. सदर घटनेतील आरोपी हा गावतच एका
घरात लपून बसला असल्याची खबर टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केशव
नाईक यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ
आरोपी सागर पावशे(34) याला ताब्यात घेत अटक केली.
सागर पावशे याच्या वडीलांचा
खून १९९० साली भालचंद्र व त्याचा भाऊ भागवत पावशे यांनी दिवाळी
सणाच्या दिवशीच केला होता आणि म्हणूनच त्याचा बदला घेण्यासाठी आपण हा खून देखील
दिवाळी सणातच केला असल्याची कबुली सागरने पोलीसांना दिली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक केशव नाईक यांच्या
मार्गदर्शनाखाली याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खोपकर करत आहेत.

Post a Comment