नेवाळीच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कल्याणात आश्वासन...

सी एम चषक आणि आगरी-कोळी महोत्सवाला मुख्यमंत्र्यांची हजेरी....

 दोन वर्षांपूर्वी झालेल्या नेवाळी आंदोलनात अनेक शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. हे गुन्हे मागे घेण्यात येतील, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

कल्याणमध्ये भाजप आमदार नरेंद्र पवार यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सीएम चषकच्या बक्षीस समारंभात आणि आगरी कोळी महोत्सवाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना ज्याप्रमाणे मराठा आंदोलन आणि भीमा कोरेगाव प्रकरणातले गुन्हे मागे घेण्यात आले, तसेच नेवाळी आंदोलनाचे गुन्हेही मागे घेण्याची मागणी आगरी समाजाच्या वतीनं करण्यात आली. त्याला उत्तर देताना याबाबतीत सकारात्मक पणे विचार करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल आणि निष्पाप लोकांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. या कार्यक्रमपूर्वी सीएम चषक स्पर्धेच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आंबिवली इथं मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. यावेळी एनआरसी कंपनीच्या कामगारांनी आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. त्यावर त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.


Post a Comment

Previous Post Next Post