सातबारावर खाडाखोड करून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवला  - संबंधितांची चौकशी करा ,
मनसे गटनेते प्रकाश भोईर यांची   मागणी


 डोंबिवली  :- ( शंकर जाधव  ) 
      महापालिका क्षेत्रातील डोंबिवली पश्चिमेकडील एक गुरचरण जागेच्या कागदोपत्री खाडाखोड करून ती जागा आपली असल्याचे खोटे दस्तऐवज तयार करत शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविण्यत आल्याचा आरोप मनसे गटनेते प्रकाश भोईर पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची  सविस्तर चौकशी करून संबधितावर कारवाई करण्याची मागणी महसूल विभागाकडे केली असल्याचेहि संगीतले.


          डोंबिवली पश्चिमेकडील  सर्व्हे क्रमांक ३२ हे गुरचरण क्षेत्र असून सर्व्हे क्रमांक ३१ सीआरझेड मध्ये आहे. या दोन जागेच्या सातबारा मध्ये सरकारी अधिकार्यांना हाताशी धरून फेरफार करत सर्व्हे क्रमांक ३२ चा टीडीआर मिळविण्यात आला आहे. तसेच सर्व्हे क्रमांक ३१ वरील बदला बाबत महसूल विभागाने महापालीकेस कोणतीही नोटीस किंवा सूचना न देता परस्पर बदल केल्याचे निदर्शनास येत आहे. यातून आपल्या राजकीय पदाचा फायदा घेत संबंधितांनी  शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडविला आहे. यामुळे हा टीडीआर तातडीने रद्द करावा आणि सात बारावर खाडाखोड करणाऱ्या संबधीताची चौकशी करून ज्यांनी पालिका आणि महसूल विभागाची फसवणूक केली आहे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रकाश भोईर यांनी केली आहे. या भूखंडावरील टीडीआर विकासकांना विकून स्वताचे आर्थिक हित साधत पालिकेचे नुकसान करणाऱ्या संबधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मात्र हा कोट्यावधी रुपयाचा घोटाळा नेमका कोणी केला याबाबत उघडपणे नाव घेण्यास त्यांनी नकार दिला असून याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यास सत्य समोर येईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच  महापालिकेने २० ऑगस्ट २०१२ साली मला नोटीस धाडली आहे. ३० ऑगस्ट रोजी या प्रकरणी महापालिकेला मी खुलासा दिल्यानंतर या तक्रारीतून माझे नाव वगळण्यात आले आहे. महसूल विभागाने स्थगिती दिली असून जेव्हा गरज लागेल तेव्हा हि जागा आम्ही ताब्यात घेऊ. घरांना ग्रामपंचायत काळात कर आकारणी करण्यात आली असून माझे घर माझ्या जन्मापूर्वी पासून असून ते एक मजली नाही तर केवळ उन, पावसापासून सरक्षण करण्यासाठी आई वडिलांनीच या घरावर पत्र्याची शेड टाकलेली आहे. आपले राहते घर वडीलोपर्जीत असून महापालिका अस्तीत्वात येण्यापूर्वीच्या कराच्या पावत्या आपल्याकडे आहेत. या घरासमोर असलेल्या मैदानाला आयओडी मिळालेली आहे. मात्र राजकीय द्वेषापोटी आपल्यावर असले आरोप केले जात असल्याचे स्पष्टीकरण यावेळी  भोइर यांनी दिले .

Post a Comment

Previous Post Next Post