डोंबिवलीतील निवासी भागात बसमध्ये बेवारस बॅॅग
डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवलीतीलयेथील ओद्योगिक निवासी भागात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमध्ये दोन बेवारस बेग सापडली यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती ओमकार शाळेजवळ बस आल्या नंतर शेवटच्या सीटवर दोन बॅग सापडल्याने केडीएमटी बसएक तास थांबून ठेवली.
एमआयडीसी मधील ओमकार शाळेचा जवळ असलेल्या बस स्टॉपवर डोंबिवलीकडे जाणारी बस आली असता शेवटचा सीटवर दोन बॅग असल्याचे प्रवाशांनी कंडक्टरचा लक्षात आणून दिले पण त्या बस मधील कोणत्याही प्रवाशाची नसल्याने कंडक्टरने पोलीस येईपर्यंत बस थांबवून त्या बॅग रस्त्यावर कडेला ठेवल्या यामध्ये साधारण 1 तास गेला. बॅग पाहण्यासाठी लोकांनीही गर्दी केली होती. पोलिसांनी बॅग उघडून पहिली असता त्यात कागत पत्रे, बँक पासबुक इत्यादी सामान होते. कागदपत्रे व ओळख पत्रावरून गिरीश शहा नावाचा इसमाची ती बॅग असल्याचे कळले आहे.बेगेचा तपास केला असता त्यात काही कागदपत्र आढळून आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

Post a Comment