ब्रेकिंग न्यूज ...
काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी नवीन सिंग आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव काळू कोमस्कर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात....
डोंबिवली :- ( शंकर जाधव) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कल्याण येथे मेट्रोच्या उद्घाटनासाठी येणार आहेत.यावेळी काँग्रेसने त्यांना काळे झेंडे दाखवुन निषेध करणार असल्याचे संगीतले होते. यावर डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी प्रदेश प्रतिनिधी नवीन सिंग यांना नोटीस बजावली होती.आज मंगळवारी दुपारी दीड वाजता नवीन सिंग यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.तर काल काँग्रेसच्या पदाधिकार्यना पोलिसांनी फोनवरून संपर्क करत निषेध करणार आहात का याची माहिती घेतली होती.मात्र निषेध करणार नाही असे एका डोंबिवलीतील युवक काँग्रेस पदाधिकार्यानी सांगितले होते.तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव काळू कोमास्कर यांनाही टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मेट्रोच्या उद्घाटन प्रसंगी या दोन्ही पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करू नये म्हणून या दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Post a Comment