हातेरी येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातुन वनराई बंधारा
जव्हार प्रतिनिधी :जितेंद्र मोरघा
जव्हार: जव्हार तालुक्यातील हातेरी गावातील ग्रामस्थांनी नाल्यात ग्रामस्थांनी श्रमदानातुन सुमारे ३०फुट लांबीचा वनराई बंधारा साकारला. या अडवलेल्या पाण्याचा शेतकर्यांसाठी आणि जनावरांसाठी फायदा होणार आहे.त्यामुळे शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.हातेरी येथील सरपंच ,सदस्य आणि ग्रामस्थ सहकार्याने हातेरी गावाजवळ शेजारच्या नाल्यात सुमारे ३० फुट लांबीचा बंधारा साकारला प्लॅस्टिकच्या गोणी मध्ये माती भरुन हा बंधारिरा तयार करण्यात आला.या बंधार्यात अडविलेल्या पाण्याचा शेजारच्या पाड्यांना फायदा होणार आहे.या पाण्यामुळे शेजारची विहरीची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले .या उपक्रमाला ग्रामपंचायत हातेरीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्थांनी योगदान दिले.

Post a Comment