सरत्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका.... 
प्रभाग अधिकारी जाळ्यात..  
              २५  हजारांची लाच घेताना अटक.. 

डोंबिवली : (शंकर जाधव) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरत्या वर्षी पुन्हा एकदा पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला असून आय प्रभाग अधिकारी शरद पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी २५  हजरांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ अटक केली आहे.पालिकेच्या २३ वर्षाच्या कारकिर्दीत एकूण ३४ अधिकारी कर्मचाऱ्यांंसह नगरसेवक ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागलें आहेत.
       कल्याण-डोंबिवली  महानगर पालिकेला भ्रष्टाचाराणे पोखरले असल्याने लाचखोरीला उधाण आले आहे.पालिकेत गेल्या अनेक वर्षात दोन डझनाहून अधिका अधिकारी व कर्मचार्यांना लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटका करूनही लाचखोरीची चटक अद्यापही अधिकारी व कर्मचार्या मधील खुमखुमी कमी झालेली नाही काही दिवसांपूर्वी ,पालिकेतील घनकचरा विभागात वारसा हक्काने नोकरीमध्ये कायमकरण्याकरिता मूल्यमापन अहवालावर शेरा लिहण्यासाठी आरोग्य निरीक्षक मोहन दिघे याने १० हजाराची लाच मागितली होती.या प्रकरणी मंगळवारी सकाळी अँन्टी करप्शन ब्युरो विभागाने साफळा रचून आरोग्य निरीक्षक मोहन दिघेला पाच हजाराचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केल्याची घटना घडली होती. तोच पुन्हा एकदा आय प्रभाग अधिकरी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला .सदर तक्रार दार यांचे  माणेरे-चिंचपाडा येथे बांधकाम केलेल्या चाळी अनधिकृत असुन त्यावर कारवाई न करण्यासाठी प्रभाग अधिकारी शरद पाटील यांनी  ८०,०००/- लाचेची मागणी केली होती.तडजोडी अंती पहिला हप्ता २५  हजारांचा ठरला याबाबत तक्रार दाराने  ठाणे लाचलुचपत प्रतिबधक विभगाकडे तक्रार केली होती या तक्रारीची शहानिश करत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत त्याला २५  हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.  केडीएमसीतील लोकप्रतिनिधी राजवटीच्या १९९५ साला पासून आजमिती पर्यंतच्या २३ वर्षात ३४ लाचखोर अधिकारी व कर्मचारी लाचखोरीत अटक तर आजी माजी दोघा नगरसेवकांचा समावेश.

लाचखोर अधिकारी व कर्मचारी वर्ग लाचखोर अधिकारी व कर्मचारी. 
१) एप्रिल १९९५ तुकाराम संख्ये (सुपरवायझर) अनधिकृत बांधकाम विभाग १,५००/- रुपयांची लाच स्वीकारताना अटक
२) मार्च १९९६ मधुकर शिंदे (अन्न निरीक्षक) ५,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना अटक.
३) नोव्हेंबर १९९७ सुनील जोशी (कार्यकारी अभियंता )अज्ञात इसमाने फोन वरून माहिती दिल्याने झडती मध्ये टेबल ड्रोवर मध्ये २८,८०० /- रुपये सापडल्याने अटक.
४) नोव्हेंबर १९९७ जयवंत म्हात्रे (उप.अभियंता )(मयत ) अज्ञात इसमाने फोन वरून माहिती दिल्याने झडती मध्ये टेबल ड्रोवर मध्ये ६०,००० /- रुपये सापडल्याने अटक.
५) मार्च १९९८ राजधर केदारे (आरोग्य निरीक्षक) (मयत) ड प्रभाग क्षेत्र कार्यालय ५,०००/- रुपयांची लाच घेताना अटक
६) नोव्हेंबर १९९८ वसंत सांगळे वरिष्ठ लिपिक (सेवा निवृत्त )४००/- रुपयांची लाच घेताना अटक.
७) नोव्हेंबर १९९८ नारायण परमार (अधीक्षक) ४००/- रुपयांची लाच घेताना अटक.
८) जानेवारी १९९९ वसंत खाडे (लिपिक) ३,०००/- रुपयांची लाच घेताना अटक.
९) जानेवारी १९९९ धोंडीबा कातकर (कनिष्ठ अभियंता ) १२,०००/- रुपयांची लाच घेताना अटक
१०) एप्रिल २००० भालचंद्र नेमाडे (उप अभियंता ) ४,०००/- रुपयांची लाच घेताना अटक.
११) डिसेंबर २००८ अजित सिंग (लिपिक शिक्षण मंडळ )सह.शिक्षिके कडून एरीयसचा चेक देण्यासाठी   ,०००/- रुपयांची लाच घेताना अटक.
१२) एप्रिल २००० सुरेश पवार (उपायुक्त) मालमत्ता विभागात जाहिरातीचा ठेका मिळवून देण्यासाठी अडीज लाख रुपयांची लाच घेताना अटक.
१३) फेब्रुवारी २०१० सुनील जोशी (अभियंता सहा.नगर रचन रचनाकार )कल्याण स्पोट् कॉम्प्लेक्स कामाचा ठेका मिळवून देण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना अटक.
१४)सप्टेंबर २०१० प्रशांत नेर (लिपिक ) मालमत्ता विभागात अपंग महिले कडून स्टोल्स प्रकरणी  १०,०००/- रुपयांची लाच घेताना अटक
१५) नोव्हेंबर २०१० सुहास गुप्ते (ब प्रभाग क्षेत्र अधिकारी) १५,०००/- रुपयांची लाच घेताना अटक.
१६) नोव्हेंबर २०१० नवनीत पाटील (कामगार ) १५,०००/- रुपयांची लाच घेताना अटक.
१७) फेब्रुवारी २०१४ गणेश बोराडे (ब प्रभाग क्षेत्र अधिकारी ) ३ लाख रुपयांची लाच घेताना अटक.
१८) एप्रिल २०१४  दतात्रय मस्तूद (उप अभियंता ) (मयत)  ब प्रभाग क्षेत्र ४ लाख रुपयांची लाच घेताना अटक.
१९) एप्रिल २०१४  विलास कडू (शिपाई ) ४ लाख रुपयांची लाच घेताना अटक.
२०) मार्च २०१३ महमंद अन्वर खान कामगार १,०००/- रुपयांची लाच घेताना अटक.
२१) २२ जुलै २०१६ विजय बनसोड १,२००/- रुपयांची लाच घेताना अटक.
२२) ५ नोव्हेंबर २०१६ गणेश बोराडे (सहाय्यक आयुक्त व प्रभाग क्षेत्र अधिकारी ) १,५०,०००/- रुपयांची लाच घेताना अटक.
२३) २५ नोव्हेंबर २०१६ प्रकाश चौधरी (उप अभियंता ) १०,०००/- रुपयांची लाच घेताना अटक
२४) ६ डिसेंबर २०१६ जेजोराम वायले ( ज्यू.लिपिक ,आय - प्रभाग क्षेत्र कार्यालय ) साडे तीन हजाराची लाच घेताना अटक.
२५) २७ डिसेंबर २०१६  राजन ननावरे (वरिष्ठ लिपिक केडीएमसी परिवहन विभाग ) सात हजार रुपयांची लाच घेताना अटक .
२६) १ जुलै २०१७ स्वाती गरुड (प्रभाग क्षेत्र अधिकारी जे -४ ) २५,००० /- हजार रुपयांची लाच घेताना अटक .
 २७) २७ ऑक्टोबर २०१७ मुख्य आरोग्य निरीक्षक संजय धात्रकयाला ठेकेदाराकडून ४० हजारांची लाच घेताना.
२८) २७ ऑक्टोबर २०१७ आरोग्य निरीक्षक सदाशिव ठाकरे याला ठेकेदाराकडून ४०  हजारांची लाच घेताना.
२९) २७ ऑक्टोबर २०१७ पालिका कर्मचारी विजय गायकवाड याला ठेकेदाराकडून ४०  हजारांची लाच घेताना.
३०) १३ जुलै २०१८ अतिरिक्त आयुक्त संजय घरत सह सह त्यांचा स्वीय सहाय्यक ललित आंब्रे व पालिका कर्मचारी भूषण पाटील या तिघांना आठ लाखांची लाच स्वीकारताना अटक.
३१) ११ डिसेंबर २०१८ आरोग्य निरीक्षक मोहन दिघे याला दहा हजाराची लाच घेताना अटक. 
३२) २८ डिसेंबर २०१८ पालिकेच्या आय प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी शरद पाटील

पालिकेतील आजी माजी नगरसेवक

१)एप्रिल २०१४ शिवसेना पुरस्कृत माजी अपक्ष नगरसेवक विद्याधर भोईर यांनी एका महिले कडून बांधकाम पाडायचे नसल्याच्या प्रकरणी ४ लाख  रुपयांची लाच घेताना अटक.

२)ऑक्टोबर २०१६ प्रभाग क्र. ४४ नेतिवली टेकडीचे विद्यमान भाजपा नगरसेवक गणेश भाने यांनी अवैध बांधकामां विरोधात परवानगी देण्यासाठी संबधित कंत्राटदारा कडून १,००,०००/- रुपयांची लाच घेताना अटक



Post a Comment

Previous Post Next Post