सरपंच हनुमान ठोंबरे यांच्या घरी श्री दत्त जयंती साजरी
डोंबिवली :- ( शंकर जाधव  )  खोणी ग्रामपंचायत सरपंच हनुमान ठोंबरे यांच्या नवनाथ कृपा बंगला येथे श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी १० वाजता श्री दत्त मूर्तीची अभिषेक व पूजा, सकाळी ११ ते १ वाजेपर्यत गावदेवी भजन मंडळ ( आंबेशिव ) यांचे भजन, सायंकाळी ६ वाजता रामाणाचार्य ह.भ.प.विश्वनाथ महाराज वारिंगे ( पाले ), रात्री ८ वाजता शिवतेज म्युजिकल ग्रुप ( खोपोली )ने भावगीते, भक्तिगीते, पोवाडे, गजल, मराठी गीतांचा सदाबहार संगीतमय कार्यक्रम संपन्न झाल्याचे सरपंच हनुमान ठोंबरे यांनी सांगितले. दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ भक्ती गणांनी घेतला.


Post a Comment

Previous Post Next Post