सर्व केबल ऑपरेटर्स येत्या २९ तारखेला 'ब्लॅॅकआउट`करणार 
    डोंबिवली :-  ( शंकर जाधव) दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय)ने पॅॅकेजच्या नावाखाली जे दर ठरवले आहेत ते ग्राहकांच्या व ऑपरेटर्सच्या हिताचे नाही तर ब्रॉडकास्टर्सच्या हिताचे असूनग्राहकांना यामुळे जादा पैसे मोजावे लागणार आहेत. याविरुध्द आवाज उठवण्यासाठी सर्व केबल ऑपरेटर्स येत्या २९ तारखेला 'ब्लॅॅकआउट`करणार आहेत. तसेच उद्या मुंबईत यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

  नव्या वर्षात ग्राहकांना आपल्या पसंतीचे चॅॅनल पहाता यावे यासाठी व जेवढे चॅॅनल तेवढे पैसे देण्यात येणार असल्याने हे केबल ऑपरेटर्सना परवडणारे नाही अशी भूमिका केबल असोसिएशनने घेतली असून याचा निषेध म्हणून २९ डिसेंबरला 'ब्लॅॅकआउट`करण्याचा इशारा दिला आहे.नव्या दरामुळे केबल ऑपरेटर्स, ग्राहक यांचे   आर्थिक नुकसान होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.केबल चालकांना नव्या योजनेमुळे अवघे १० टकके कमिशन मिणार असून यामध्ये कर्मचार्याचे वेतन,व इतर खर्च परवडणारे नाहीत म्हणून केबल ऑपरेटर्सना किमान ४० टक्के कमिशन मिळावे  अशी मागणी ऑपरेटर्स सधाने केली आहे.ट्रायने या सर्व बाबींचा विचार करुन तोडका काढावा यामागणीसाठी २६ जानेवारी रोजी दिल्लीत देशातील सर्व केबल ऑपरेटर्स मोर्चा काढणार आहेत. दरम्यान १ जानेवारी पासून दूरदर्शन संच बंद पडू नये म्हणून सर्व अंतिम निर्णय होईपर्यत हंगामी पॅॅकेज तयार करण्यात आली असून ग्रहकांनी त्यापैकी एक पॅॅकेज निवडावे असे आवाहन करण्यात आले आहे पहिले पॅॅकेज २२५ रुपये,दुसरे ३१६ तिसरे ३१८ ,चौथे ३९२ व पाचवे ७०० रुपये असे दर ठरवले आहेत असेही एका पदाधिकार्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगीतले.

Post a Comment

Previous Post Next Post