कल्याण ग्रामीण
भागात विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत हत्ती रोगाचे सहा विद्यार्थी संशयित
कल्याण : कल्याण
पूर्वेतील मलंग रोडवर असलेल्या द्वारली गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या
करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीत सहा विद्यार्थ्यां मध्ये "हत्तीरोग"
या आजाराचे विषाणू आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्यध्यापक रोहिदास
मदन चव्हाण यांनी हत्तीरोग संक्रमण पडताळणीमध्ये ही सहा मुलं पॉझिटिव्ह आढळून
आल्याची माहिती दिली आहे.
कल्याण पूर्वेतील मलंगरोड
परिसर हा वेगाने वाढणाऱ्या नागरी वस्तीचा परिसर आहे. येथील द्वारली गावातील जिल्हा
परिषदेच्या शाळेत सहा विद्यार्थ्यांमध्ये हत्तीरोगाचे विषाणू आढळून आल्याने खळबळ
उडाली. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने लहान मुले तपासणीत पॉझिटिव्ह आढळल्याने
चिंता व्यक्त होत आहे. सदर शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास मदन चव्हाण यांनी
पत्रकारांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, ‘हत्तीरोग संक्रमण
पडताळणीमध्ये शाळेतील सहा मुलं पॉझिटिव्ह आढळून आली आहेत.’
द्वारली येथील
जिल्हा परिषदे शाळेत हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. ठाणे जिल्हा आरोग्य
विभाग हिवताप निरर्मुलन पथकाच्या डॉक्टरांच्या पथकामार्फत हे सर्वेक्षण केले गेले.
त्यांनी केलेल्या तपासणीत ६ व ७ वयोगटातील पहिली व दूसरी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या
सहा विद्यार्थ्यांमध्ये हत्तीरोगाचे विषाणू आढळून आले. पालकांच्या उपस्थितीत
डॉक्टरांच्या सल्ल्याने या तपासणी शिबिरात सदर विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात
येत आहेत. सदर विद्यार्थी हे हत्तीरोगाचे संशियित रुग्ण असल्याचा प्राथमिक अंदाज
सध्या व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हे वृत्त पसरताच त्या विद्यार्थ्यांमध्ये
आढळलेले विषाणू हे हत्तीरोगाचेच आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी महापालिका
प्रशासन व जिल्हा आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.
हत्ती रोगाचे
संशियित विद्यार्थी आढळून आल्यामुळे पालकांच्या उपस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने
या तपासणी शिबिरातच त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. तसेच रोजच्या रोज मुले औषधी
गोळ्या घेतात की नाही. तसेच देखरेखीसाठी मागरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक
कर्मचारी पाहणीसाठी येत असल्याची माहिती, तसेच सव्र्हे अंतर्गत संदर्भात
विघार्थीनी आतापर्यंत येथे येण्या आगोदर केलेल्या स्थालंतरा बाबतची माहिती भरुन घेतल्याची
माहिती मुख्याध्यापक चव्हाण यांनी सांगितली.
कल्याण डोंबिवली
पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता द्वारली शाळा जिल्हा
परिषदेच्या आत्यारिखेत असुन,
जिल्हा आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी
केली आहे. याबाबत आम्ही तातडीने दखल घेत पालिकेचे मुख्य आरोग्य आधिकारी यांच्या
समवेत डाँक्टराचे पथक द्वारली येथील संक्रमित हत्ती रोग बाथित
विघार्थीसाठी तापसणी व उपचारार्थ पाठविले आहे.
दरम्यान महिला बाल
कल्याण समितीच्या सभापती दिपाली पाटील या हत्तीरोग संक्रमनीत संशयात
विद्यार्थ्यांना भेट देणार असल्याचे सांगितले.

Post a Comment