कवी नवनाथ रणखांबे यांच्या ‘जीवन संघर्ष’ कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न


 कल्याण : कवी कट्टा ग्रुप कल्याण मुंबई आणि शारदा प्रकाशन यांच्या वतीने कवी नवनाथ रणखांबे यांच्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा  धम्मदीप सांस्कृतिक मंडळ हॉल, चिंचपाडा रोड, कल्याण येथे नुकताच  संपन्न झाला. साहित्यिक प्रा. दामोदर मोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक सिताराम गायकवाड  हे उपस्थित होते. साहित्यिक विजयकुमार गवई यांच्या हस्ते कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी  समाजसुधारणेची  सुरुवात  आपण स्वतः पासून केली पाहिजे आणि ती सुरुवात जीवन संघर्ष कविता संग्रहामधून नवनाथ रणखांबे  यांनी केली आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांनी काव्यसंग्रहातील कवितांनवर  सुंदर विवेचन केले.कविता संग्रहाचे कौतुक केले. कवितेवर भाष्य , डॉ. प्रा. शाहाजी कांबळे ,संजय थोरात , श्रीकृष्ण टोबरे , पी.बी.भडांगे, संतोष चव्हाण , या प्रमुख वक्ते यांनी जीवन संघर्ष कविता संग्रहाचा वेध घेतला आणि शुभेच्छा दिल्या, या काव्य संग्रहात  जीवनाचा वेध घेणाऱ्या कविता आहेत. हा काव्य संग्रह जीवनाच्या संघर्षाला जरूर प्रत्येकाला ऊर्जा प्राप्त करेल , जीवन संघर्ष जगण्याची प्रेरक शक्ती आहे अश्या  प्रकारे काव्य संग्रहाविषयी मते मान्यवरांनी पुस्तकात प्रतिक्रियामध्ये व्यक्त केली आहेत. समारंभाचे अध्यक्ष प्रा.दामोदर मोरे यांनी अनुभवाची कळा आल्याशिवाय कवितेचा  जन्म होत नसतो असे बोलतांना सांगितले. पुस्तक प्रकाशन समारंभास कला साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, इ. क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांनची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
शैक्षणिक, सामाजिक,कला, साहित्य इ. विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्यांना मान्यवरांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने आणि हिराबाई हरिचंद जगदेव स्मृती पुरस्काराने मान्यवरांना सन्मानित   करण्यात आले. प्रा.दामोदर मोरे , विजयकुमार गवई , सीताराम गायकवाड , प्रा. शुक्राचार्य गायकवाड, डॉ. प्रा. शहाजी कांबळेश्रीकृष्ण टोबरे, संजय थोरात, संतोष चव्हाण , विलास बसवंत, पी.बी.भडांगे, संतोष खोत, मिलींद जाधव, जगदेव भटू, विजयकुमार भोईर, प्रतीक्षा थोरात, नाना नेटावटे, मास्टर राजरत्न राजगुरू ,पी.बी.भडांगे, कांतीलाल भडांगे, प्रज्ञेश सोनवणे, संघरत्न घनघाव , लक्ष्मण घागस, अनिल शिंदे, कवी दीप, मनीषा मेश्राम,विष्णु खांजोडे, अबीडकर साहेब, सचिन बागुल, दिक्षा मोरे इ. पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रत्येक वर्षी सामाजिक , शैक्षणिक, कला, साहित्य, इ. क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणार असल्याचे कवी कट्टा ग्रुप कल्याण मुंबईचे अध्यक्ष नवनाथ रणखांबे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. प्रास्ताविक आशा रणखांबे सूत्रसंचालन मिलिंद जाधव यांनी तर आभार विजयकुमार भोईर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post