अभ्यासाचे नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी डोंबिवलीतील भराडी आई बिल्डिंग नं.५ च्या वतीने व्याख्यानमाला  संपन्न 


डोंबिवली :- ( शंकर जाधव  ) डोंबिवली पूर्वेकडील आजदे पाडा येथील भराडी आई बिल्डींग नं.५ च्या वतीने `माझे शिक्षण माझी परीक्षा` विषयावर व्याखानमालेचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मुंबई विद्यापीठाच्या मिताली मुसळे,धनजंय शेट्ये आणि प्रमुख पाहुणे म्हणून भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब,माजी सरपंच जयंता पाटील, अध्यक्ष शशांक घागरे,खजिनदार महेंद्र शेट्ये,अरविंद मुकादम आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी ? वेळेचे नियोजन कसव करावे ? सादरीकरण कसे करावे या उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

            यावेळी भाजप ककल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब म्हणाले, परीक्षा हे आपल्या डोक्यावरच ओझे आहे हे विद्यार्थ्यांनी डोक्यातून काढून टाकावे.वेळेचे नियोजन आणि अभ्यास यामुळे यश नक्की मिळते. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करू अभ्यास करावा. परीक्षेला पेपर सोडविताना घाई करू नये. परीक्षेची भीती मनातून काढून टाकली पाहिजे. आपल्या भविष्यासाठी परीक्षा खूप महत्वाची असते. आपले जीवन आपली पदोपदी परीक्षा घेत असते स्मार्ट पद्धत अभ्यास केल्यास लक्षात राहतो. मी अनेक सोसायटीच्या अनेक कार्यक्रमातजातो. परंतु एखाद्या सोसायटीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी अश्या प्रकारची व्याख्यानमाल प्रथम पहिली. याचा आदर्श प्रत्येक सोसायटीने घेतला पाहिजे.यावेळी पालकवर्ग आणि विद्यार्थांनी गर्दी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post