कोमल प्रल्हाद यादव पालिकेच्या
शाळेतून पहिली... तिची बहिणीही
पालिकेच्या शाळेतून आली होती पहिली..
डोंबिवली : ( शंकर जाधव)
- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेतील माध्यमिक शालांत
परीक्षेत डोंबिवलीतील आजदेपाडा येथील कोमल प्रल्हाद यादव या विद्यार्थ्यीने ९२
टक्के मिळवून पालिकेच्या शाळेत ती पहिला
क्रमांकात
आली आहे. गेल्या वर्षी तिची मोठी बहिण प्रिया हिने देखील पालिकेच्या शाळेत ९१.६० टक्के मिळवून पालिकेच्या
शाळेतून पहिला क्रमांक मिळवला होता. या
दोन्ही बहिणीना मराठी विषयात उत्तम गुण मिळाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या शाळेत
उत्तम शिक्षण मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्याचा दावा या दोघी बहिणींनी फोल ठरवत
उत्तम गुण मिळविले आहेत.
डोंबिवली
पूर्वेकडील स्टेशनजवळील पालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेतील कोमल प्रल्हाद यादव हिला
माध्यमिक. एकूण ५०० गुणांपैकी ४६० गुण मिळाले आहेत. पालिकेच्या शाळेतून पहिली आली
असून वडील – प्रल्हाद आणि आई –शांती
आणि शाळेतील शिक्षणांमुळे हे यश मिळाल्याचे कोमलने सांगितले. कोमलची मोठी बहीण
प्रियानेही पालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतले होते. तिनेही पालीकेच्या शाळेतून
पहिला क्रमाक मिळविला होता.वडिलाची पानाची टपरी असून त्यावर त्यांच्या
कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. मुख्याध्यापिका विना सिंह, गणेश
भानुशाली, संजयकुमार दहाट, तानाजी
लिलके यासह शाळेतील सेवक अशोक कांबळे, शरद भंडारी,रोहित बोयत यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न
करत आहेत.

Post a Comment