के बी के इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांनी विद्यार्थांसोबत काढली वृक्षदिंडी
आमदार नरेंद्र पवार यांचा वृक्षदिंडीत सहभाग
टिटवाळा : निसर्ग संवर्धन
करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यभरात 33 कोटी वृक्षारोपणाचा महत्वकांक्षी संकल्प हाती घेतला आहे. याच
पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी समाजिक संस्था , सोसायटी, शाळा , महाविद्यालय,युवकांचे ग्रुप यांच्यावतीने वृक्ष
लागवड कार्यक्रम राबवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे . याच धर्तीवर टिटवाळा
नजीकच्या बनेली ठिकाणी असलेल्या के बी के
इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांनी देखील आपल्या विद्यार्थांसोबत वृक्षदिंडी काढत येथील मोहिली
परिसरात वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. झाडे लावा झाडे जगवा तसेच
पर्यावरण विषयक जनजागृती करणारे घोषवाक्याचे फलक हातात घेऊन वृक्ष संवर्धनाचा नारा
देत विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आमदार नरेंद्र पवार यांनी वृक्षदिंडी खांद्यावर घेत स्वत: विद्यार्थ्यांमध्ये
सहभागी झाले होते.
यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार , महापौर विनीता राणे, उपमहापौर उपेक्षा भोईर ,शिक्षण सभापती नमिता
पाटील, कृ.उ.बा. समिती कल्याणचे सदस्य मयुर
पाटील , सहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई, वन परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे ,तसेच के बी के
स्कूलचे संचालक सुबराव खराडे, संचालक मंडळ पदाधिकारी, शाळेच्या
मुख्याध्यापक , शिक्षक , विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले
होते.


Post a Comment