टिटवाळयाच्या कुशल ची
राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
टिटवाळा: टिटवाळा येथील विनायक
मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे प्रशिक्षण घेणाऱ्या कुशल तिवारी या खेळाडूने ७ जुलै
२०१९ रोजी पुणे येथे पार पडलेल्या राज्य
स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत आपले खेळातील वर्चस्व सिद्ध करत सुवर्ण पदकाला गवसणी
घातली. याच सुवर्ण खेळी मुळे लवकरच होणाऱ्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी
त्याची निवड करण्यात आली आहे.
कुशल तिवारी हा गेल्या ४ वर्षापासून विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन
येथे मुख्य क्रीडा प्रशिक्षक विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे व किक
बॉक्सिंग खेळाचे अद्यावत क्रीडा प्रशिक्षण घेत आहे. कराटे खेळात देखील राष्ट्रीय
सुवर्ण पदक मिळवुन स्वीडन येथे झालेल्या जागतीक कराटे स्पर्धेत देखील आपल्या
उत्कृष्ट खेळीचा ठसा त्याने उमटवला आहे. आता सर्व टिटवाळा वासियांना राष्ट्रीय
किकबॉक्सिंग स्पर्धेत त्याच्याकडून विजयाच्या अपेक्षा त्याच्या कडुन आहेत. सदर
राज्य स्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी कुशलला आर्थिक पाठपुरावा करणारे
सिद्धेश्वर ग्रुप बिल्डर आणि डेव्हलपर्स, श्री गणेश इन्स्टिट्यूट आणि
विनायक मार्शल आर्ट्स यांनी कुशल तिवारी याला आपले कौशल्य सिद्धि करण्यासाठी दिलेल्या
संधीचे त्याने सोने केले आहे. याच प्रकारे राष्ट्रीय स्पर्धेसाठी देखील लागणारा
खर्च देखील जास्त असल्याने त्या स्पर्धेसाठी देखील कुशलला स्पॉन्सरशिपची आवश्यकता आहे.

Post a Comment