डोंबिवलीतील त्या गुंडप्रवृत्तीच्या रिक्षाचालकांंची महिलेस भररस्त्यात मारहाण...

  मारहाण करणाऱ्या त्या  रिक्षाचालकाला शोधण्यास पोलिसांसमोर आव्हान.....


 डोंबिवली : ( प्रतिनिधी: शंकर  जाधव) क्षुल्लक कारणावरून तीन गुंडप्रवृत्तीच्या रिक्षाचालकांनी एका महिलेस भररस्त्यात मारहाण केल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील इंदिरा चौकात मंगळवारी रात्री साडे दहा  वाजण्याच्या सुमारास घडली. महिलेच्या दोन मुलांनाहि मारहाण केल्याने काही नागरिकांनी रिक्षाचालकांना जाब विचारला.नागरिकांना संतापलेले पाहून त्या रिक्षाचालकांनी तेथून पळ काढला.या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाच्या रिक्षाचा नंबर महिलेने घेतला नसल्याने रिक्षाचालकाला शोधायचे कसे असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

     ३५ वर्षाची एक महिला आपल्या दोन मुलांसह इंदिरा चौकातून पायी चालत जात होते. महिलेच्या मुलाने मागे वळून रिक्षाचालकाकडे पहिले असता त्या गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकाने रिक्षातून उतरून मुलास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला सोडवण्यास त्याची आई आणि बहिण मध्ये पडले असता त्यांनाहि त्या रिक्षाचालकासह त्याचे इतर रिक्षा चालविणाऱ्या साथीदारांनी मारहाण ककरण्यास  केली.सदर ठिकाणी हा प्रकार सुरु असताना काही नागरिक त्या महिलेच्या मदतीला धावून आले.नागरिकांचा संताप पासून गुंड प्रवृत्तीचे रिक्षाचालक पसार झाले.या घटनेनंतर महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्हाची नोंद केली. मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाच्या रिक्षाचा नंबर महिलेने घेतला नसल्याने रिक्षाचालकाला शोधायचे कसे असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.दरम्यान इंदिरा चौकात काही मुजोर रिक्षाचालकांची दादागरी वाढली असून पोलिसांनी वेळीच अश्या घटनेने गांभीर्य ओळखले नाही आणि कारवाई केली नाही तर नागरिकांना अश्या रिक्षाचालकांच्या दहशतीच्या छायेखाली रहावे लागेल.

2 Comments

  1. सी सी कॅमेरे नाहीत का? या रिक्षा चालकांना अखंड भारतातील कोठेही रिक्षा चालकाचा तर सोडाच कोणत्याही वाहन चालकाचा परवाना मिळता कामा नये. तसेच याच चौकात यांच्या आया बहिणीनं समोर यांना नागडे करून चोपणे हीच एकमेव शिक्षा झाली पाहिजे.

    ReplyDelete
  2. Tya riksha chalakala shiksha vhaylach havi. Pan tyacha aaya bahinina ka nagda karaychi bhasha karta? Comment jara japun kara.

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post