डोंबिवली :- ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत अनेक वर्षापासून शिवसेना- भाजपची सत्ता आहे. तरीही रस्त्यांत खड्डे हे डोंबिवलीकरांना दरवर्षीचे झाले आहे. महासभेत अनेक वेळेला यावर चर्चा करून आणि स्थायी समितीत टेंडर काढूनहि रस्त्यांतील खड्डे बुजवण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. यावर्षीही अशीच परिस्थिती असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना गणपती सणाच्या आगमणा अगोदर डोंबिवलीचे खड्डेमय रस्ते बुजवले नाही तर वाजत गाजत गुलाल उधळत पालिका आयुक्तांना `खड्डेरत्न` पुरस्काराने गौरवण्यात येईल.यापूर्वीहि नागरिकांच्या समस्यांसाठी मनसेने अनोखे आंदोलन केले होते. आताहि मनसेने अश्या प्रकारे पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी दिला जाणाऱ्या पुरस्कारामुळे चर्चेत आली आहे.
महापौर विनिता राणे यांच्या प्रभागातील रस्त्यात खड्डे पडले असून येथील रिक्षाचालकांनी फलक लावले होते. तर गणेशनगर येथील रस्त्यातील खड्डे रिक्षाचालकांनी श्रमदानातून आणि दिवसभरातील कमाईतून खड्डे बुजवले. विशेष म्हणजे एका शिवसैनिक पुढाकाराने पूर्वेकडील एका रस्त्यातील खड्डे बुजवण्यात आले.आता गणपती सण तोंडावर आला असून सत्ताधारी पक्षांना मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र लिहून `खड्डेरत्न` पुरस्कार स्विकारण्यास तयार रहा, योग्य सहकार्याच्या अपेक्षेसह` असे लिहिले आहे. याबाबत मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम म्हणाले, डोंबिवली आणि रस्त्यात खड्डे असे समीकरण झाले आहे. याचे गांभीर्य पालिका प्रशासना नसल्याने या खड्ड्यामुळे एखाद्या नागरिकांचा बली गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का ?. मनसे गप्प बसणार नाही. अनेक वेळेला मनसे नगरसेवकांनी महासभेत पालिका प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही. म्हणून यावेळी डोंबिवलीतील रस्त्यातील खड्ड्याकडे पाहता लवकर हे खड्डे बुजवले गेले नाही तर `खड्डेरत्न` पुरस्कार देऊ. तर मनसे डोंबिवली महिला अध्यक्षा मंदा पाटील म्हणाल्या, पालिका प्रशासन डोंबिवलीतील रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी का दिरंगाई करत आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, माजी सभागृह नेते राजेश मोरे हे डोंबिवली शहरात राहतात. तरीही डोंबिवली शहराची काय अवस्था झाली आहे.

Post a Comment