त्या तीन रिक्षाचालकांनी बुजवला गतिरोधकाच्या दोन्ही बाजूकडील खड्डे बुजवले...

पालिकेच्या उपअभियंता वसईकर  दुर्लक्ष करत असल्याचा आरोप..

डोंबिवली ( शंकर जाधव) : रस्त्यातील खड्डे आणि पालिकेचे दुर्लक्ष असे समीकरण असे असले तरी जनता मात्र शांत बनत नाही.
पालिकेकडे तक्रार करूनही प्रशसनाने लक्ष दिले नसल्याने तीन रिक्षाचालकांनी नांदिवली रोडवरील अभिनव बँकेसमोरील रस्त्यातील गतिरोधकाच्या दोन्ही बाजूस असलेले खड्डे बुजवले.रिक्षाचालक मिलिंद मालवडे यांच्यासह तीन रिक्षाचालकांनी सदर रस्त्यातील खड्यांमुळे अपघात होऊ नये म्हणून केलेल्या या कामाचे कौतुक होत आहे.तर 'इ' प्रभाग क्षेत्रातील उपअभियंता वसईकर यांनी या परिस्थितीकडे लक्ष दिले नसल्याने आम्हाला या रस्त्यावरील खड्डे बुजवावे लागले असे या रिक्षाचालकांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post