डोंबिवलीत कारखानदारांना वार्षिक विवरण पत्र प्रशिक्षण

 


डोंबिवली ( शंकर जाधव )  

औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य  संचलनालय कल्याण आणि अंबरनाथ मॅनिफॅक्चर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामा संघटनेच्या सुनील सभागृहात वार्षिक विवरण पत्र प्रशिक्षण वर्गाचे घेण्यात आले.यावेळी कारखानदारांकडून वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा अर्ज भरून घेण्यात आला. त्याचप्रमाणे कारखानदारांनी कर्मचाऱ्यांना कोणत्या सुविधा देणे अपेक्षित आहे यासंदर्भात कारखानदारांना प्रशिक्षण देण्यात आले. दरवर्षी हे आढावा अर्ज हाताने भरून द्यावे लागतात. मात्र आता हे अर्ज ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरून द्यायचे असल्याची माहिती  कामा संघटनेकडून देण्यात आली. यावेळी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य  संचलनालयाचे उपसंचालक लक्ष्मीकांत गोराणेमाधव तोटेवाड आणि हिम्मतराव शिंदे यांनी कारखानदारांना मार्गदर्शन केले. यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनीराजू बैलुर, वालावलकर आदिसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Post a Comment

Previous Post Next Post