रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचा 2022-23 सालच्या अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा


डोंबिवली ( शंकर जाधव ) 

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचा 2022-23 सालच्या अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा डोंबिवली पूर्वेकडील गणेश मंदिर सभागृहात पार पडला.याप्रसंगी रो.अजय कुलकर्णी यांनी मावळते अध्यक्ष रो. जितेंद्र नेमाडे यांच्याकडून 29 वे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली.रो. किशोर अढळकर यांनी रो. अतुल कुवळेकर यांच्याकडून सचिव पदाची सूत्रे स्वीकारली. तसेच रो. अनिल हिरावत यांनी रो. प्रदीप बुडबाडकर यांच्याकडून खजिनदार पदाची सूत्रे स्वीकारली. 

रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 चे मुख्य प्रशिक्षक रो. श्रिजित यांनी रोटरीच्या नवीन सदस्यांना शपथ दिली. याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 च्या उप प्रांतपाल डॉ आरती धूत या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या व रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 च्या सचिव कीर्ती वडाळकर या मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.  कार्यक्रमाचे सूत्र संचालन रो. डॉ लीना लोकरस व रो. डॉ. मकरंद गणपुले यांनी केले. याप्रसंगी अनेक रोटरी सदस्य, त्यांचे कुटुंबीय, रोटरॅक्टर इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post