शबरीमला मंदिर निर्णय : डोंबिवलीतील रॅलीत ३२०० मल्याळींचा सहभाग....
डोंबिवली -शंकर जाधव : शबरीमला मंदिरासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा आम्ही आदर करतो, पण कोर्टाने जो निर्णय दिलाय तो आम्हां महिलांना मान्य नाही कारण ही आमची परंपरा आहे शबरीमला मंदिरात न जाता ही धर्माच पालन करता येईल . वय वर्ष १० ते ५० वर्षाच्या महिलांना मंदिरात जाण्यास मज्जाव होता मात्र कोर्टाच्या निर्णयाने महिलांना प्रवेश मिळणार आहे मात्र आज डोंबिवली शहरात हिंदू महासंघनम आणि भारतीय जनता पार्टी साऊथ इंडियन सेल अंतर्गत सकाळी डोंबिवली पश्चिमेकडील अंबा भवांनी मंदिरापासून ते डोंबिवली पूर्व राजाजी पंथ येथील अयप्पा मंदिरापर्यंत एक मोठी रॅली मल्याळी समाजाच्या वतीने काढण्यात आली होती ह्या रॅलीत शेकडो महिला होत्या पुरुष व महिला असा ३२०० जणांचा डोंबिवली ठाकुर्ली नागरिकांचा हा मोर्चा होता.आम्ही आमच्या परंपरा मोडणार नाही १० वर्षापर्यंत आणि ५० वर्षानंतरच आम्ही मंदिरात जाऊ अस मत येथील महिला व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. सरकारने आमच्या भावनांचा पुनर्विचार करावा अशी ही मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली.
Post a Comment